भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
गडचिरोली वरून मुरूमगांव कडे स्वतःच्या दुचाकी (स्कुटी ) ने कर्तव्यावर जात आसताना युवक गंम्भीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 9:00वाजता चे सुमारास राष्ट्रीय महामार्गवरील गिरोला – दूधमाळा च्या दरम्यान घडली.
रमेश निसार 45 जखमीचे नावं असून ते स्वर्गीय रामचंद्र दखने विद्यालय मुरूमगांव येथे कर्मचारी असून ते नेहमी प्रमाणे आपल्या दुचाकी क्रमांक MH 33AG3543 या दुचाकीने गडचिरोली वरून मुरूमगांव कडे कर्तव्यावर जात असतांना गिरोला -दूधमाळा च्या मध्ये त्यांची दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात गेल्याने घसरून खाली पडून त्यांच्या डोक्याला गंम्भीर दुखापत होऊन जखमी झाल्याची घटना घडली.
दरम्यान रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यानी सदर घटनेची माहिती धानोरा येथील पत्रकार तुफान उंदीरवाडे यांना फोन द्वारे माहिती होताच ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे सपंर्क करून त्वरित डॉ.गजबे यांनी रुग्णवहीका पाठवून जखमीची परीस्थिती लक्षात घेता त्यांना गडचिरोली येथे उपचारासाठी पाठविण्यात आले जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे उपचारर्थ पाठविल्याची माहिती आहे. अधिक तपास सुरु आहे.



