Home Maharashtra टवेटोला जवळ दोन वाहना मध्ये सामोरा समोर धडक…

टवेटोला जवळ दोन वाहना मध्ये सामोरा समोर धडक…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

          धानोरा तालुक्यातील मुरूमगाव रोडवर मौजा टवेटोला येथे पूला जवळ आज सकाळी दोन ट्रक ची समोरासमोर धडक होऊन दोन्ही गाडयाचे कॅबीन चकनाचूर झाले आहेत पण दोन्ही चालक सुरक्षित आहेत.

           ट्रक क्रमांक MH 34-BH9277 हा ट्रक सूरजागड प्रकल्पातून लोहगीटटी घेऊन गडचिरोली वरून धानोरा मार्गै छत्तीसगढ राज्य ला निघाला होता आणी CG10-BR8556 ट्रक क्रमांक छत्तीसगढ राज्य वरून महाराष्ट्र राज्य धानोरा मार्ग गडचिरोली कडे भरधाव वेगात जात होता.

            ही घटना दिनांक 16 फेब्रुवारी सकाळ 8:00ते 9:00 दरम्यान घडली त्यामूळे मुरुमगाव ते टवेटोला आणी येरकड ते टवेटोला पर्यत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहणाच्या लांबचलांब रांगा लागल्या आहे त्यामुळे वाहनां धारकांना वाहन काढताना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

          पोलीस मदत केन्द्र येरकड याची पुढील चौकशी करीत आहेत.