मुनघाटे महाविद्यालयात जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे यांची जयंती व पुण्यतिथी साजरी…

 भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधि 

          स्थानिक धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचीरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे दिनांक 16/ 2 /2024 ला महाविद्यालयामध्ये स्वर्गीय जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

           यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंकज चव्हाण यांच्या हस्ते स्वर्गीय जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे यांचे प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंकज चव्हाण सर हे होते तर विशेष अतिथी म्हणून महाविद्यालयातील प्रा. डॉ. किरमीरे सर, प्रा.डॉ. जंबेवार मॅडम, प्रा.डॉ. डी. बी. झाडे सर हे मंचावर उपस्थित होते.

          यावेळी प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण सर यांनी संस्थेचे प्रेणास्थान श्री जिवनराव सिताराम पाटील मुनघाटे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. आदिवासी बहुल भागामध्ये उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. आमच्या भागातील विद्यार्थ्यांनी देखील उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या व देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे करिता कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणापासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत ची सोय उपलब्ध करून दिली.

           सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान असून अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे ते धनी होते असे वक्तव्य प्राचार्य डॉ.चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. गणेश चुधरी यांनी केले, तर आभार प्रा.डॉ.प्रियंका पठाडे यांनी मानले.

            यावेळी महाविद्यालयातील सर्व वरिष्ठ तथा कनिष्ठ, तसेच सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.