जय भोले क्रीडा मंडळ पाली(उमरी) च्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धासंपन्न… — पाळासावलीची कबड्डी टिम विजेता ठरली…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

            पारशिवनी तालुक्यातील पाली उमरी येथे अंडर ५८ किलो वजनातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन १६ ते १७ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते.

            यावेळी कबड्डी स्पर्धेचे उदघाटन रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार एड. आशिष जयस्वाल यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार ईश्वर खंगार, रमेश तांदळकर, बंटी जयस्वाल, दिनेश आदेवार,कैलास खंडार, रितेश वलुकार हे प्रमुख्याने उपस्थितीत होते..

           यावेळी आशिष जयस्वाल यांनी गाव विकास व युवक विकास यावर मार्गदर्शन करून मंजूर कामांची माहिती विशद केली.

          सदर स्पर्धेचे आयोजन जय भोले क्रीडा मंडळ पाली(उमरी) च्या वतीने करण्यात आले.

            यावेळी प्रथम क्रमांक विजेता पालासावळी ता.पारशिवनी कबड्डी संघ यास प्रथम बक्षिस आशिष जयस्वाल यांचे वतीने तर द्वितीय क्रमांक विजेता लालबहादूर शास्त्री कबड्डी संघ बाभुळवाडा ता.पारशिवनी या संघाला राजेंद्र मुळक यांचे वतीने तर तृतीय क्रमांक विजेता संघ सवर्णी जि. छिंदवाडा यास ग्रामपंचायत नवेगाव खैरीचे सरपंच फजीत सहारे यांचे वतीने वितरित करण्यात आले.

            या स्पर्धेत ३० पेक्षा अधिक संघाने भाग घेतला होता. विजेत्या कबड्डी संघांना सरपंच फजीत सहारे यांच्या हस्ते विजेत्या संघांना स्मृतीचिन्ह व पारितोषिक वितरण करून गौरविण्यात आले.स्पर्धेच्या यशस्वी आयोनासाठी साहिल ठाकूर, अनोज गजबे,गुलाब डोनारकर, प्रमोद खंडाटे, अमित शिलार,प्रसीक मेश्राम, अनुज डोनारकर,अरुण सेंदरे,क्रिष्णा सेंदरे, सतिश भागडकर,महेश डोनारकर, मंगेश राऊत व इतर युवकांनी यांनी अथक परिश्रम घेतले.