युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
राजश्री शाहू महाराज व्यायाम शाळा व कै.भेंडे आखाडा उपराईचे संचालक राहुल सुरेश खंडारे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.
दि.15 डिसेंबरला अमरावती जिल्हा खासदार कार्यालय येथे भारत सरकार क्रिडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा , तथा आंतराष्ट्रीय सार्क संघटनेचे युवादुत ,संत गाडगेबाबा विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामीत सिनेट सदस्य, तसेच महाराष्ट्र शासनाचे कार्यकारी अधिकारी डॉ.मनिष गवई यांच्या हस्ते राहुल खंडारे यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे स्वागत होत आहे.



