Home Social आई वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृद्धाश्रमास 15 हजार रुपयांची जिवनापयोग वस्तू दान, कुऱ्हाडे परिवार...

आई वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृद्धाश्रमास 15 हजार रुपयांची जिवनापयोग वस्तू दान, कुऱ्हाडे परिवार दशकापासून जोपासत आहे सामाजिक दायित्व…

 युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक 

         आई वडीलांच्या स्मृती पित्यर्थ कुऱ्हाडे परिवारा कडून श्री गजानन महाराज वृद्धाश्रम, नायगाव (बोर्डी ) ता. अचलपूर येथे 15 हजार रुपये किंमतीच्या जिवनपयोगी वस्तूंची देणगी दान करण्यात आली. गेल्या 10 वर्षापासून कुऱ्हाडे परिवार सामाजिक दायित्व जोपासत आहे.

        अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खल्लार येथिल शाखा प्रमुख सुरेश कुऱ्हाडे हे दरवर्षी डिसेंबर महिन्यात त्यांची आई शेवंताबाई कुऱ्हाडे व वडील पुंडलिकराव कुऱ्हाडे यांच्या स्मृती पित्यर्थ सामाजिक उपक्रम राबवितात. 

            या वर्षी श्री गजानन महाराज बहुउद्देशिय सेवाश्रम,पुणे द्वारा संचलित श्री गजानन महाराज वृद्धाश्रम, नायगाव (बोर्डी ) येथिल आश्रमात अन्नदान व 15 हजार रुपये किंमतीच्या जिवनपयोगी स्वयंपाक वस्तूची देणगी देऊन आई वडिलांना आदरांजली वाहिली यावेळी गोपाल भोंडे, सौ शालिनीताई भोंडे, विनोद सपकाळ, सौ.अरुणाताई सपकाळ, बाबुराव गोरे, सौ. वनमालाताई गोरे, देणगी देणारे सुरेश कुऱ्हाडे, सौ. ममताताई कुऱ्हाडे, विनोद कडू, गजानन सगणे, विपुल राऊत, आश्रमातील वृद्ध महिला पुरुष व सेवक संजय शहाकार उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष सचिन मेटकर यांनी कुऱ्हाडे परिवाराचे पुणे येथून फ़ोन द्वारे कौतुक केले आहे.