Home Maharashtra अखेर अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषदेच्या लढ्याला यश… — सावलीत...

अखेर अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषदेच्या लढ्याला यश… — सावलीत आदिवासी मुली मुलांच्या वस्तीगृह जागेचा प्रश्न मार्गी जागेची झाली मोजणी विद्यार्थ्यांना मिळणार स्वतंत्र्य इमारत…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

           सावली तालुक्यात आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून अनेक विद्यार्थी बाहेरगावावरून तालुक्याच्या स्थळी शाळा महाविद्यालयाला शिक्षण घेण्याकरता येत असतात मात्र घरची हालकाची परिस्थिती असल्यामुळे अनेक जणांना अर्ध्यावरतीच शिक्षण सोडावी लागत होतं मुला-मुलींना येण्याचे सुविधा नाही व तालुक्याच्या ठिकाणी रूम करून राहण्याची परिस्थिती नाही.

         अशा अनेक सोयी सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत सावलीला तालुक्यातील आदिवासी समाजाच्या मुली मुलांना उच्च शिक्षणाची योग्य सोय उपलब्ध व्हावी समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होऊ नये याकरिता मुला मुलींचे वस्तीगृह असणे काळाची गरज होती.

       अनेक वर्षापासून आदिवासींच्या मुली मुलांना योग्य शिक्षणाच्या सोयी मिळत नव्हते. 

         तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी मुले मुलांच्या वसतिगृह इमारत असणे आवश्यक होती तालुक्यात वस्तीगृह आणण्याकरिता सुद्धा अनेक दिवसांपासून पायपीट करावी लागली व वस्तीगृह सावलीमध्ये निर्माण झाले मात्र जागा नसल्याने स्वतंत्र इमारत तरी बांधाची कुठे असाही प्रश्न निर्माण झालेला होता वस्तीगृहाची निर्मिती झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसापासून वस्तीगृह भाड्याच्या इमारतीमध्ये चालविले जात आहे.

           वस्तीगृहाच्या इमारत बांधकामाकरिता स्थानिक तालुका स्थळी शासकीय जागा मिळावी यासाठी अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषद शाखा सावली येथील सर्व संघटनेचे पदाधिकारी,सर्व समाज बांधव यांनी अनेक दिवसापासून जागेच्या शोध मोहिमेत आपलं प्रयत्न कायम सुरूच ठेवले व जागेचा शोध लागला मात्र ती जागा सावलीकरांच्या क्रीडांगणासाठी वापरत असल्याने काही क्रीडापटू यांनी वस्तीगृह या जागेवर न बांधता दुसऱ्या ठिकाणी बांधावस हेका लावला सावलीकरांचे हित लक्षात घेता अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी एक पाऊल मागे येत वसतिगृहाला जागा मिळवण्याचीलढाई , सुरूच ठेवली जर क्रीडांगणाची जागा सावलीकरांना देत असाल तर कुठली जागा उपलब्ध करून द्या अशी वारंवार मागणी नगरपंचायत सावली, तहसीलदार सावली, वन विभाग सावली यांच्याकडे रेटून धरले होती.

        अतुल कोडापे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा युवा अध्यक्ष ,प्रवीण गेडाम अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सावली तालुका हे सतत प्रशासनासोबत प्रश्न लावून धरल्यानंतर वसतिगृहाची इमारत बांधकामाचे जागेचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता गेल्या तीन चार वर्षापासून ही मागणी व,वेळोवेळी शासन प्रशासन यांना अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषदेच्या माध्यमातून शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांना अनेक निवेदन दिले.

       आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी वस्तीगृह इमारत बांधकामाकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रशासन नेहमी गाजर दाखवीत होते मात्र अतुल कोडापे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा अध्यक्ष चंद्रपूर यांनी आपल्या सावली तालुक्याच्या संघटनेच्या पदाधिकारी यांना घेऊन आमरण उपोषणाचे हत्यार उपसले दिनांक १९/१२/२०२४ ते २३/१२/२०२४ पाच दिवस आपल्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता सावली तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसले बघता बघता उपोषणाची चर्चा शासन दरबारी पोहोचली आणि उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी मुल, तहसीलदार, वन विभाग यांनी भेट देऊन आपली मागणी नक्कीच मान्य होईल असे आश्वासन दिले त्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.परंतु प्रश्न मिटला नव्हता.

         काही कालावधीनंतर शासन प्रशासनाची दुप्पट भूमिका दिसून आल्याने ही मागणी परत शासन दरबारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने रेटून धरली दरम्यानच्या काळात काही समाज कंटकानी सदर विषयाचं विरोध करत जिल्हा अध्यक्ष अतुल कोडापे आणि सावली तालुका अध्यक्ष प्रवीण गेडाम यांना जीवे मारण्याच्या धमक्या व सोशल मीडियावर व्हायरल केले.

        परंतु हम हार नही मानेंगे,हम अपने हक ओर अधिकार के लिये लढेंगे उलगुलान हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी लढाई चालूच ठेवली, वारंवार मंत्रालयात जाऊन मंत्र्याच्या भेटी निवेदने दिले आणि तेव्हा कुठे त्यांच्या अथक परिश्रम याला फळ मिळालं आणि दिनांक १५/१२/२०२५ रोजी प्रशासनाकडून कोर्टाच्या समोरील दोन एकर जागेची पाहणी मोजणी झाली.

          कोणतेही राजकीय पाठबळ नसताना, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असताना,कशाचीही अपेक्षा न करता अतुल कोडापे व सावली तालुका अध्यक्ष प्रवीण गेडाम आणि सर्व पदाधिकारी जन सेवेचे जे व्रत हाती घेतले समाजाने त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार देऊन गौरव करावे, अशी मागणी आदिवासी समाज बांधवांनी केली आहे. 

         या आंदोलनाला कृष्णा कन्नाके,सावली तालुका उपाध्यक्ष उत्तम गेडाम, लखन मेश्राम, सचिव अशोक कन्नाके, एकनाथ कन्नाके, युवराज उईके, वासुदेव मडावी, भास्कर गेडाम, रमेश कन्नाके, नागेश गेडाम, युवराज पेंदाम, लक्ष्मण सोयाम सर, किरण गावळे,आणि संपूर्ण सावली तालुक्यातील आदिवासी समाज बांधव यांनी सहकार्य केले.

         अखेर अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषद सावली ला आले यश व जागेची मोजणी करण्यासाठी यंत्रणा जागेवर येऊन इमारती करिता जागा मोजणी केली यावेळी गृहपाल रविंद्र गजबिये, मोजणी अधिकारी ईश्वर कातोडे, चव्हाण तलाठी संतोष मडावी, युवराज पेंदाम, समीर मडावी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.