शासनाने धानाचे हमी भाव जाहीर करून धान खरेदी केंद्र सुरू करा.:-दिवाकर भोयर यांची मागणी….

भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी

 गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आधार भूत किमतीने खरेदी विक्री सोसायटी अंतर्गत धार खरेदी केले जाते. मात्र यावर्षी नोव्हेंबर महिना अर्धा संपला आणि शेतकऱ्यांच्या धानाची कापणि मळणी होवुन दिवाळी सणाच्या तोंडावर धान खरेदी केंद्रा अभावी सण साजरा करण्यासाठी, शेतकरी स्वताच्या गरजा पूर्ण करण्याकरिता तसेच सावकारी कर्ज फेडण्यासाठी धान्य अतिशय कमी भावात व्यापाऱ्याला विकत आहे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान्याचा हमीभाव जाहीर करून आधार खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी दिवाकर भोयर यांच्यासह शेतकऱ्यांनी केले आहे.

           प्रसिद्ध पत्रकात त्यांनी म्हटले आहे की गडचिरोली जिल्ह्यात पावसाळी म्हणजे खरिप हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पन्न घेतले जाते. मात्र यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिल्याने पूर्वी धान पीकाची दुबार पेरणी करावी लागली. निसर्गाच्या लहरी पणावर आधारलेली जिल्ह्यातील शेती शेवटच्या टप्प्यात किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट होताना दिसते.जड धानाला पाण्याचा फटका बसला बळीराजांचे भातपीक करपले, तसेच जिल्हात जंगलि हत्तीने शेकडो शेतकर्याचे हातात आलेले धानपिक तुडविले त्यामुळे शेतकऱ्यांनी भिती पोटी लवकर धान्य कापावे लागले. दिवाळी सणाच्या तोंडावर आपलि गरज दूर करण्याकरता बळीराजांनी कापणि व मळणी सुरू केली पण घरी धान साठवणे शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेरचे आहे. खरेदी केंद्र सुरू न झाल्याने धान विकायचे कुठे हा मोठा प्रश्न बळीराजापुढे निर्माण झालेला आहे. अशाच परिस्थितीत शेतकऱ्यांना स्वतःचे धान्य अतिशय कमी किमतीत व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. कोणताही परवाना नसलेले, गावागावात असलेले खाजगी व्यापारी बळीराजाचे धान्य अतिशय कमी पैसे देवून घेत आहेत. यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होतांना दिसते .धान्याचे खरेदी करण्याकरिता खरेदी केंद्रावर सातबारा सप्टेंबर महिन्यापासून ऑनलाईन कामे सुरू असूनही दिवाळी संपली पण खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत.

            सध्या तरी बळीराजावर संकट उभे टाकण्याची दिसून येते पाण्याअभावी धान करपले उभे असलेले धान कीडीने फस्त केले आणि हाती आलेले धान्य सरकार घेण्याच्या कोणतेही हालचाली करताना दिसत नाही जगाचा पोशिंदा समजला जाणारा बळीराजाच भरडला जात आहे त्यामुळे सरकारने सकारात्मक पाऊल उचलून जिल्ह्यातील धान्याचे भाव जाहीर करून आधारभूत दान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी दिवाकर भोयर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.