स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत भाजपच्या वतीने इंदापूर शहरात भव्य तिरंगा बाईक रॅली…    – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बुलेट वरून रॅलीत सहभागी.

 

निरा नरसिंहपुर दिनांक: 16

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

    देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत मंगळवार दि. 15 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य अशी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच भाजपचे राज्य उपाध्यक्ष राजेश पांडे , पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे आणि पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोटर सायकल समवेत या रॅलीत सहभागी होऊन त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

       वीरश्री मालोजीराजे भोसले चौकातून वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली त्यानंतर ही रॅली खुळे चौक मार्गे 100 फुटी -रामवेस नाका- नेहरू चौक- खडकपुरा- इंदापूर नगरपालिका तसेच आय कॉलेज आणि त्यानंतर जुनी मार्केट कमिटी अशी रॅली काढण्यात आली.शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

   इंदापूर नगर परिषदेच्या प्रांगणात माजी सैनिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला तसेच स्वातंत्र्यसेनांच्या स्मृती स्तंभास अभिवादन करण्यात आले.इंदापूर महाविद्यालयामध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते एकाचवेळी 77 वृक्षारोपण करण्यात आले.त्यानंतर ही रॅली जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी असणाऱ्या कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा समारोप करण्यात आला.

    हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ मेरी माटी मेरा देश या संकल्पनेतून 77 वृक्षरोपण आपण केले तसेच हर घर तिरंगा या उपक्रमाबरोबरच शहरात भव्य अशी तिरंगा बाईक रॅलीचे आपण आयोजन केले. भारताला जगामध्ये मोठा सन्मान प्राप्त करून देण्याचे मोठे कार्य आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा मान उंचावला आहे. त्यासाठी सर्वांनी कणखर अशी साथ त्यांना द्यावी.

    राजेश पांडे म्हणाले की,’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आपण सर्वजण मिळून 2047 ला आपला देश जगात विश्वगुरू बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. जगातली एक नंबरची अर्थव्यवस्था बनण्याची संकल्पना घेऊन ते कार्य करीत आहेत.

   वासुदेव काळे म्हणाले की,’ देशातील 140 कोटी जनतेचा सहभाग असावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा हा संकल्प राबवला गेला सर्व सामान्य प्रत्येक माणसांच्याप्रति देशप्रेम जागवण्यासाठी हे अभियान राबवले आहे.