ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
भंडारा : शिवसेना (एकनाथ शिंदे गट) भंडारा जिल्हा प्रमुख पदावर नुकतेच भाजपातून शिवसेनेच्या शिवबंधनात अडकलेले लाखनी तालुक्यातील मा. पद्माकर बावनकर यांची नियुक्ती झाली असून, रविवारला (ता.१५) रोजी भंडारा येथील मंगलमुर्ती सभागृहात आयोजीत पूर्व विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते नियुक्ती पञ देण्यात आले आहे.
नवनियुक्त शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पद्माकर बावनकर हे सलग दोनदा भाजपाचे लाखनी तालुका अध्यक्ष तर भाजपाचे जिल्हा महामंञी देखील राहीले आहेत. त्यांनी पक्ष बळकटीकरण व पक्ष वाढीवासाठी भाजपात अनेक वर्ष काम केले असल्याने संघटनात्मक त्यांना दांडगा अनुभव आहे. पक्षात चाललेल्या मनमानी आणि गैर प्रकारामुळे त्यांनी गत आठ दिवसांपूर्वी भाजपाला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेचे धनुष्यबान हातात घेतले आहे.
सदरची नियुक्ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली असून, नियुक्ती पञ देतांना नागपुर लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार मनोहर चंद्रीकापुरे, गडचिरोली लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार सहसराम कोरेटे, मा. सोनु रमेशजी कुथे, मा. सुयश चंद्रीकापुरे, मा. अनिलजी गायधने, मा. संजयजी कुंभलकर यांच्या सह पुर्व विदर्भातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..



