Home सांस्कृतिक भावेश कोटांगले उत्कृष्ट लोककला पुरस्काराने सन्मानित…  – सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार...

भावेश कोटांगले उत्कृष्ट लोककला पुरस्काराने सन्मानित…  – सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते स्वीकारला सन्मान…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

 साकोली :– अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दिल्या जाणार्‍या यंदाच्या उत्कृष्ट लोककला पुरस्काराने प्रबोधनकार कला व साहित्य संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष, उत्कृष्ट लोककलावंत व एकोडी ग्रा.पं.चे सदस्य भावेश कोटांगले यांना सन्मानित करण्यात आले असून दि. १४ जून २०२५ रोजी यशवंत नाट्य मंदिर, मनमाला टैंक रोड, माटुंगा, मुंबई येथे  महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कोटांगले यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

         सुप्रसिद्ध नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा १४ जून रोजी आयोजित करण्यात येतो. त्यावेळी नाट्यकर्मीना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कृत कै. शाहिर साबळे, कै. सुधीर भट, कै. स्मिता तळवळकर, कै आनंद अभ्यंकर स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट लोककला पुरस्कारासाठी यावर्षी एकोडी येथील भावेश कोटांगले यांची निवड करण्यात आली होती. भावेश कोटांगले यांच्या प्रबोधनात्मक लोककला सादरीकरणाची दखल घेवून हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला.

          या सन्मानाबद्दल परिषदेचे अध्यक्ष व चित्रपट अभिनेता प्रशांत दामले, उपाध्यक्ष नरेश गडेकर, प्रबोधनकार मनोज कोटांगले, परमानंद मेश्राम, एकोडी येथील सरपंच संजय खोब्रागडे, प्रा. शंकर बागडे, राहुल तागडे, मंगेश कोटांगले, सुकराम बन्सोड, वैभव खोब्रागडे, कैलास जांभुळकर, कार्तिक मेश्राम, तिर्थानंद बोरकर, प्रल्हाद मेश्राम, केवळ बघमारे, धनंजय धकाते,  रवी भोंगाने, प्रबोधनकार संघटनेचे सर्व पदाधिकारी, झाडीपट्टी वादक संघटना व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले.