लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड आयर्न ओर तर्फे हेडरी येथे वस्त्र उद्योग,दवाखाना,लॉयड्स सी बी एस इ स्कूलचे भूमिपूजन सोहळा… — पुरसलगोंडी ग्रामपंचायतील सरपंच, उपसरपंच, पाटील, पोलीस पाटील, भूमिया यांचे हस्ते भूमिपूजन सोहळा सपन्न… — लॉयड्स संचालक राजेश गुप्ता, डेप्युटी कलेक्टर शुभम गुप्ता,उपविभागीय पोलीस अधिकारी एटापली सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी बापूराव दादास आणि लॉयड्स संचालक बी. प्रभाकरण,संचालिका किर्ती रेड्डी, लॉयड्सचे संचालक मधुकर उपस्थित….

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

आज दि.15 /4/2023 गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड आयर्न ओर तर्फे हेडरी येथे वस्त्र उद्योग,दवाखाना,लॉयड्स सी बी एस इ स्कूलचे भूमिपूजन पुरसलगोंडी ग्रामपंचाययाचे उपसरपंच राकेश कावडो आणि इतर सरपंच,उपसरपंच, पाटील, पोलीस पाटील, भूमिया यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे.

        या लॉयड्स संचालक राजेश गुप्ता, उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता,उपविभागीय पोलीस अधिकारी एटापली सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी बापूराव दादास, त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीचे संचालक बी.प्रभाकरन,लॉयडसचे संचालिका किर्ती रेड्डी, लॉयड्सचे संचालक मधुकर गुप्ता, इतर अधिकारी, पोलीस अधिकारी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

       या वेडी एम. डी. बी. प्रभाकरण यांनी आपल्या मार्गदर्शनातून पुरसलगोंडी ग्रामपंचायतील 1000 आदीवासी महिलाचा विकासा करिता शिवण कला प्रशिक्षण देऊन वस्त्र उद्योग कंपनीची निर्माण केलं जाईल. इथे बनविलेले वस्त्र हे परदेशात विकले जातील सुपर क्लास वन उत्तम दर्जेचा मल्टी हॉस्पिटल (दवाखाना) आणि आदिवासी मुली-मुलांसाठी सी. बी. एस. इ शाळा आणि वसतिगृह बनविला जाईल यात विध्यार्थी यांना अति दर्जेचा सोय-सुविधा राहणार असल्याचे माहिती दिलेत.

        पुरसलगोंडी ग्रामपंचायतील सरपंच, उपसरपंच, पाटील, पोलीस पाटील, भूमिया यांनी भूमिपूजन सोहळाला मोठ्या संख्याने उपस्थिती होते.