अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, खल्लार ठाणेदारांची कारवाई.

 

युवराज डोंगरे/खल्लार

खल्लार पोलिस स्टेशन हद्दीत विना नंबरचा अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह खल्लारच्या ठाणेदार चंद्रकला मेसरे यांनी 16 एप्रिलला सकाळी 4:15वाजताच्या सुमारास पकडला असून दोन आरोपींवर खल्लार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खल्लारच्या ठाणेदार चंद्रकला मेसरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गौरव उमेश येवले(22)व निसार शहा, अफजल शहा(20)दोघेही रा माहुली धांडे हे विना नंबरच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीने अवैध रेती वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार ठाणेदार मेसरे यांनी रात्री 4:15वाजताच्या सुमारास नरदोडा फाट्याच्या समोर गजानन महाराज मंदिराजवळ विना नंबरचा ट्रॅक्टर व ट्रॉली पकडली चार हजार रुपयांची एक ब्रास रेती व अडीच लाख रुपयांचा ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकुण 2,54,000 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त केला व आरोपी गौरव येवले, निसार शहा विरुध्द अप न 98/23 कलम 379,34 नुसार गुन्हा दाखल केला