भारत मुक्ती मोर्चा व इतर संघटने द्वारा,”आज देशभर ईव्हीएम मशीन विरोधात,जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे.‌ — बहुजन समाज एकसंघ होऊ लागला व ईव्हीएम मशीन हटाव विरोधात आरपारची लढाईला वेग येऊ लागला..

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक 

        ईव्हीएम मशीन म्हणजे आधुनिक मनुस्मृती होय.ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुका देशातील बहुजन समाजाला गुलामगीरीत ढकलत आहेत व त्यांचे सर्व हक्क नाकारत आहेत.

        यामुळे ईव्हीएम मशीनला निवडणूक प्रक्रियातून बाद करणे आवश्यक झाले आहे व ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून या देशातील नागरिकांना गुलामगिरीत ढकलणाऱ्या षडयंत्रापासून वाचवणे गरजेचे आहे.

          म्हणूनच भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी ईव्हीएम मशीन विरोधात आरपारच्या लढाईला सुरुवात केली असून याबाबतचा महत्वपूर्ण टप्पा मोर्चाचे माध्यमातून आज देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर व्यक्त होणार आहे…

             ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या निवडणुका या विश्वासार्ह नाही व भयमुक्त नाही.ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या निवडणुका मतदारांनी दिलेले मत कुणाला जात हे स्पष्ट करीत नाही.

       यामुळे ईव्हीएम मशीन द्वारा घोटाळे करून निवडणुका जिंकल्या जातात हे भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सन २०१३ ला व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी सन २०१७ ला सर्वोच्च न्यायालयात शिध्द करून दाखविले आहे.

           सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन लढ्यात त्यांच्या पुराव्यानिशी तर्कसंगत वैचारिक युक्तिवादाला सर्वोच्च न्यायालयाने मान्य करीत ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या निवडणुका या विश्वासार्ह व भयमुक्त नसल्याचे मत व्यक्त केले आहे‌.

         याचाच अर्थ ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या निवडणुका या मत बदलाचे घोटाळे करून जिंकल्या जातात हे वास्तव आहे.

          भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त हे ईव्हीएम मशीन घोटाळ्याचे सरदार असल्याचे म्हटले आहे.

           म्हणूनच भारत मुक्ती मोर्चा द्वारा व इतर संघटने द्वारा आज देशभर ईव्हीएम मशीन हटाव विरोधात मोर्चाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले आहे.