गंगाई बहुउद्देशिय संस्था हिंगणघाट तर्फे बालदिन उत्साहात साजरा.. 

प्रितम जनबंधु

    संपादक 

हिंगणघाट:- गंगाई बहुउद्देशीय संस्था हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे बालदिनानिमित्त बालकांसोबत वेगवेगळे कार्यक्रम घेऊन बालदीन हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला. 

                 कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रीती मेश्राम मॅडम नागपूर, समाजसेविका मीना मॅडम तसेच संस्था उपाध्यक्ष मंगला लोखंडे, संस्था सचिव प्रफुल मुरार, संस्था अध्यक्ष भारतजी मुरार तसेच नलिनी भगत, आशा जवादे, मनोज मुरार, सेजल काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

                   कार्यक्रमाची सुरवात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर स्वागत गीत गेले. त्यानंतर चित्रकला स्पर्धा व नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

       स्पर्धा आयोजित करण्याचे कारण असे की, मुलामधे असणारे सुफ्त गुण मुलांनी स्वतः ओळखायला हवे, त्याच्या कलागुणांना वाव मिळावा हा प्रमुख उद्देश होय. 

          चित्रकला स्पर्धेचे प्रथम विजेतेपद सेजल काटकर यांनी मिळवले तर द्वितीय सोनम मुरार तर तिसरे विजेतेपद कायन कांबळे यांनी मिळविले. तर नृत्य स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक परीने मिळविले तर दुसरें स्थान सोनम व स्वरा मुरार व तिसरे स्थान अंजली हिने मिळविले.  

               त्यानंतर मंगला लोखंडे यांनी वाढत्या बाल अत्याचारा बाबत बालकांना जागृत करण्यासाठी मुलांवर होणारे समाजविघातक गोष्टीचा मुलांवर होणारा परिणाम किती खराब असतो याबद्दल मार्गदर्शन केले. मुलांमध्ये आत्मविश्वाची कमतरता असल्याने मुल व्यसनाकडे वळतात व त्यांचे भविष्य खराब होते.    

         असं व्हायला नको म्हणून एक समाजाचा महत्वाचा घटक म्हणून गागाई बहुद्देशीय संस्था हे जनजागृती करत आहे असे त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. 

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक नलिनी भगत यांनी केले. तर संचालन मैत्री मुरार ह्यांनी केले व आभार प्रदर्शन विराट लोखंडे यांनी केले.