Home Political प्रहार पक्षाकडून नरेंद्र टाले यांची चिखलदरा तालुका अध्यक्षपदी निवड कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण…

प्रहार पक्षाकडून नरेंद्र टाले यांची चिखलदरा तालुका अध्यक्षपदी निवड कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण…

  अबोदनगो चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी  

     दखल न्युज भारत 

चिखलदरा :- प्रहार जनशक्ती पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या प्रक्रियेत आता नवे नेतृत्व पुढे येत आहे या पार्श्वभूमीवर चिखलदरा तालुक्यातील सक्रीय व निष्ठावान कार्यकर्ते नरेंद्र टाले यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

        त्यांच्या या निवडीची अधिकृत घोषणा होताच संपूर्ण तालुक्यातील प्रहार कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नरेंद्र टाले हे प्रहार संघटनेच्या सुरुवातीपासूनच पक्षाशी जोडले गेलेले असून त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच समोर असतात.

         त्यांच्या संघटन कौशल्यामुळे व नेतृत्वगुणांमुळे पक्षात त्यांना विशेष स्थान प्राप्त झाले आहे त्यांनी शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवितात आहे त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला कार्यकर्त्यांनी योग्य निर्णय असे संबोधले आहे. चिखलदरा तालुका हा आदिवासी बहुल व डोंगराळ परिसर असल्याने येथील लोकांच्या समस्या वेगळ्या स्वरूपाच्या आहेत आरोग्य, शिक्षण, रोजगार, आणि रस्ते या मूलभूत सुविधांच्या बाबतीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

      या सर्व प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाने असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

         नरेंद्र टाले यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर संवाद साधताना सांगितले की मला दिलेली जबाबदारी ही माझ्यासाठी सन्मानाची बाब असून मी कार्यकर्त्यांच्या विश्वासाला पात्र ठरेन पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलदरा तालुक्यात प्रहार पक्षाचे बळकटीकरण करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असेल त्यांनी पुढे सांगितले की, आदिवासी, शेतकरी, तरुण आणि दुर्बल घटकांच्या प्रश्नांसाठी मी सदैव लढा देईन प्रत्येक गावात पक्षाचा झेंडा फडकवणे हेच माझे ध्येय आहे.

       अध्यक्ष पद मिळाल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला अनेकांनी सोशल मीडियावर अभिनंदनपर संदेश देत नरेंद्र टाले यांना शुभेच्छा दिल्या प्रहार पक्षाचे स्थानिक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्षणाचे साक्षीदार ठरले पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, नरेंद्र टाले यांच्या नेतृत्वात चिखलदरा तालुक्यात प्रहार पक्ष आणखी मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

         प्रहार जनशक्ती पक्षाच्या संघटनात्मक रचनेत तरुण आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली जात असल्याने पक्ष अधिक मजबुत बनत आहे एकूणच नरेंद्र टाले यांची तालुका अध्यक्षपदी निवड ही चिखलदरा तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे.

         त्यांच्या नेतृत्वामुळे प्रहार पक्षाला नवी उर्जा मिळेल आणि जनतेच्या समस्यांच्या निवारणासाठी ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आणि संजु अलोकार सर्कल प्रमुख चुरणी किसन अखंडे याची काटकुंभ सर्कल प्रमुख मुन्ना बेठेकर यांची तालुका सचिवपदी नियुक्ति करण्यात आली आहे.