Home कृषी मेळघाटातील सोयाबीन पिकाला भावच नाही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात…

मेळघाटातील सोयाबीन पिकाला भावच नाही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात…

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

        दखल न्युज भारत

अमरावती

चिखलदरा -: मेळघाटातील शेतकरी यंदाच्या दिवाळीत आनंदाऐवजी चिंतेत आहेत सोयाबीन पिकाच्या भरोशावर घरगुती खर्च आणि सण साजरा करण्याची आशा ठेवलेल्या बळीराजाला बाजारभावाने मोठा धक्का दिला आहे.

        सध्या खाजगी बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा तब्बल दीड ते दोन हजार रुपयांनी कमी दर मिळत आहेत. शासनाकडून जाहीर केलेला सोयाबीनचा हमीभाव ५३२८ रुपये प्रती क्विंटल असताना व्यापारी केवळ ३५०० ते ४००० रुपयांपर्यंतच भाव देत आहेत.अजूनही शासनाकडून सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे एका बाजूला पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आणि दुसऱ्या बाजूला भाव न मिळाल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे या हंगामात उत्पादन खर्च वाढला मजुरी खतं कीटकनाशक यांचे दर वाढले पण बाजारात मिळणारा दर उत्पादनखर्चाच्या जवळपासही नाही.

        शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पिक विकायचं तर तोटा आणि ठेवायचं तर खर्च अशी वेळ आली आहे.शेतकरी शासनाकडे हमीभावाने खरेदी तत्काळ सुरू करण्याची मागणी करत आहेत अन्यथा शेतकऱ्यांची दिवाळीच नाही. तर संपूर्ण हंगाम कर्जाच्या ओझ्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मेळघाटातील अनेक बाजारांमध्ये सोयाबीनची खरेदी थांबलेली आहे. व्यापाऱ्यांकडून मनमानी दर दिले जात आहेत शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी वाढत आहे. अन्यथा बळीराजाची दिवाळी प्रकाशाऐवजी काळोखातच जाण्याची भीती आहे. 

         सततच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबिन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे सोयाबीनला योग्य तो भाव मिळत नाही आहे त्यामुळे सोयाबिन पीक सोंगणी चे पैसे निघने कठीण झाले आहे. खाजगी व्यापाऱ्यांकडून 3000 ते 3500 रुपयात सोयाबीन खरेदी होत आहे. तरी कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन हमीभाव अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करुन सोयाबीनला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा.

नरेंद्र टाले तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ति पक्ष चिखलदरा