चिमूर शहरात शनिवारी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन… — प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांची उपस्थीती….

 

अरमान बारसागडे

तालुका प्रतिनिधी चिमूर

           चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ. सतीशभाऊ वारजुरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन जुनी न्यू राष्ट्रीय प्रेरणा कॉन्व्हेन्टच्या बाजूला असलेल्या मैदानावर येत्या १६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना. नानाभाऊ पटोले व विरोधी पक्षनेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांची उपस्थीती असल्याची माहिती तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री. विजय पाटील गावंडे यांनी दिली.

          चिमूर विधानसभा क्षेत्रात जनसंवाद पदयात्रेने नवचेतना निर्माण झाली असून , कार्यकर्त्यांत जोश निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉ. सतीश वारजुरकर यांच्या वाढदिवसा निमित्त काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले तर उद्घाटक म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांची उपस्थीती असनार आहे. 

            या प्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष, आमदार शुभाष धोटे , आमदार प्रतिभाताई धानोरकर , आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, बाळ कुलकर्णी, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, माजी खासदार मारोतराव कोवसे, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुरकर, नामदेवराव उशेंडी, आनंदराव गेडाम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषशिंग रावत, प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, डॉ. नामदेव किरसान, डॉ. नितीन कोडवते, संदीप गद्दमवार, शिवा राव, रामू तिवारी, महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रा. सूर्यकांत खनके, महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, प्रफुल खापर्डे, प्रशांत दानव, रमेश शेमले, शोहेल रजा शेख, यांची उपस्थीती राहणार आहे. 

       मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय पाटील गावंडे महाराष्ट्र प्रदेश संघटक ओबीसी धनराज मुंगले माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके व शहराध्यक्ष अविनाश अगडे यांनी केले आहे.