बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर करून शेतीहिताचे योग्य निर्णय घेण्याचा, तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनाही क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रात योग्य संधी मिळावी, यासाठी जाणीवपूर्वक करण्याची ग्वाही नवे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.
लोणीकंद (ता. हवेली) येथे श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू टाइम स्कूलच्या प्रांगणात महाराष्ट्र आणि गोवा प्रदेशातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) द्वारे आयोजित नवव्या सीबीएसई क्लस्टर क्रीडा स्पर्धाच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी कृषिमंत्र्यांसमवेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुगार्डे, संचालक प्रवीण शिंदे, द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष भरत शिंदे, उद्योजक सुमित बाजारे, भरत खेडेकर, आदित्य गायकवाड, शोभा पालवे, तसेच संस्थाप्रमुख मारुती रामचंद्र भूमकर, सचिव पांडुरंग भूमकर, संचालक गौरव भूमकर, खजिनदार अथर्व भूमकर, स्वप्निल भुमकर, शैलजा सीबीएसई क्लस्टर क्रीडा स्पर्धासाठी विविध राज्यातील तीन हजार खेळाडू आणि प्रशिक्षण सहभागी भुमकर, मृणाल भुमकर, सोनाली बाजारे, सायली गायकवाड, प्राचार्या रितिका नायडू, प्राचार्य दिलीप धंगेकर आदी उपस्थित होते.
तीन दिवसीय सीबीएसई शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये बॅडमिंटनसाठी महाराष्ट्र, गोवा राज्यांतील तर तायक्वांदोसाठी पुणे, बेंगलुरू, तिरुअनंतपुरम, केरळ राज्यातील विद्यार्थी खेळाडू तसेच प्रशिक्षकांसह सुमारे ३००० जण सहभागी झाले होते. श्री रामचंद्र शैक्षणिक संकुलात यापूर्वीही विविध क्रीडा स्पर्धाचे यशस्वीरित्या आयोजन केले. क्षेत्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर शालेय खेळाडूंचे क्रीडा नैपुण्य वाढवण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरत असल्याचे संस्थाप्रमुख मारुती भूमकर यांनी नमूद केले.
लोणीकंद येथे श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू टाइम स्कूलच्या प्रांगणात नवव्या सीबीएसई क्लस्टर क्रीडा स्पर्धाच्या पारितोषिक वितरणप्रसंगी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे व उपस्थित मान्यवर.
त्यावेळी क्रीडामंत्री, आता कृषिमंत्री कार्यक्रमासाठी वेळ दिली, त्यावेळी मी क्रीडामंत्री होतो व आता मात्र कृषिमंत्री म्हणून कार्यक्रमाला आलोय, असे सांगत मंत्री भरणे यांनी, चांगले खेळाडू तयार होण्यासाठी खेळाडूंच्या पाठीशी उभे राहण्याची शासनाची भूमिकाच असल्याने येथील खेळाडूंच्या हितासाठी शक्य त्या मदतीचे आश्वासन देऊन चांगल्या आयोजनाबद्दल न्यू टाइम्स स्कूल तसेच भूमकर परिवाराचेही कौतुक केले.



