बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्त् नबीलाल शहाबुद्दीन शेख यांच्या मातोश्री कैलासवासी सुनाबी शहाबुद्दीन शेख यांचे नुकतेच बुधवार दिनांक 14 /05 /2025 रोजी सकाळी निधन झाल्याची वार्ता कळताच लगेचच महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व सांस्कृतिक मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे चिरंजीव व इंदापूर तालुक्याचे युवा नेते श्रीराज दत्तात्रय भरणे यांनी पिंपरी बुद्रुक येथील शेख परिवाराला सांत्वन भेट दिली.सामाजिक कार्यकर्ते नबीलाल शेख परिवाराच्या दुःखामध्ये सामील होऊन सर्वच कुटुंबाचे सांत्वन केले.
युवा नेते श्रीराज भरणे सांत्वन भेटी प्रसंगी पुढे बोलत असताना म्हणाले की पिंपरी बुद्रुक गावाने मामानवर दिलेला विश्वास आणि प्रेम याबद्दल आमचे भरणे कुटुंब कधीच विसर पडू देणार नाही. सदैव तुमच्या व सर्वांच्या सुखा दुःखामध्ये सामील होणारच आसल्याचे यावेळी युवा नेते श्रीराज भरणे यांनी सांगितले.
यावेळी संचालक श्रीकांत बोडके ,उपसरपंच संतोष सुतार, प्रशांत बोडके, शाबुद्दीन शेख, महबूब शेख, सुलतान शेख, बाळासाहेब शेख, नबीलाल शेख, शमीर शख , पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख, दस्तु शेख, चांदभाई शेख, जबार शेख, रज्जाक शेख,आधी सर्वच उपस्थित होते.



