ते संघटन मजबूतीच्या कामाला लागले.. — चिमूर विधानसभा जिंकणे त्या सर्वांसाठी महत्वाचे..

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक 

         वेळ बदलतो,काळ बदलतो,कार्य बदलतात,शब्द बदलतात,जुणेनवे सहकारी जवळ येतात व दुरही जातातात,कोण कुठल्या कारणाला व भुमिकांना वेळप्रसंगी महत्व देईल हे सांगणे कठीण असते.मात्र,रुसवेफुगवे-अहंकार,इगो,छलकपट,कुटनित्या यांना बाजूला सारत त्या सर्वांसाठी चिमूर विधानसभा जिंकणे महत्वाचे आहे,हेच आजची परिस्थिती सांगून जाते आहे या वास्तव्याला नाकारुन चालणार नाही.

         चिमूर विधानसभा क्षेत्र हा काॅंग्रेस पक्षाचा गड.या गडाला माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे यांनी सन १९९५ ला पहिल्यांदा धक्का देत काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केले होते व अपक्ष उमेदवार म्हणून स्वतः विजयी झाले होते.

        त्यानंतर माजीमंत्री व आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना पक्षातंर्गत चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातून उमेदवारी दाखल केली व सन २००४ ला त्यांनी विजय संपादन केला,तेआमदार झाले.नंतर ते काॅंग्रेसवासीय झाले आणि काॅंग्रेसवासीय आहेत.

          त्यानंतर सन २०१४ व २०१९ ला श्री‌.किर्तीकुमार भांगडिया यांनी भाजपा तर्फे चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत उमेदवारी दाखल करीत आमदार झाले व आमदार आहेत.

         भाजपा सत्तेचा कार्यकाळ हा सातत्याने निराशाजनक असल्याने त्यांच्या सत्तेला चिमूर विधानसभा मतदारसंघासह अख्या महाराष्ट्र राज्यातील नागरिक वैतागले आहेत.भाजपा सरकार नकोच असे आता मतदार बोलू लागले आहेत.

        म्हणूनच चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत आपली संघटन शक्ती वाढविण्यासाठी काॅंग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एक होणे आवश्यक आहे आणि एक भुमिकांनी पक्षहितासाठी कार्य करणे गरजेचे आहे.

            चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत काॅंग्रेस पक्षाकडे कार्यकत्यांची फळी कमी नाही.तद्वतच प्रभावशाली नेतृत्व आहे.

      माजीमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार,माजी खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष व माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतीष वारजूकर, काॅंग्रेस पक्ष ओबीसी प्रदेश संघटक धनराजभाऊ मुंगले,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे,माजी जिल्हा परिषद सदस्य विलास डांगे,गजानन बुटके,माजी प.स.सभापती चौधरी ताई,पिसे ताई,माजी प.स.सदस्य व तालुका अध्यक्ष विजय गावंडे,माजी चिमूर प. स. उपसभापती स्वप्निल मालके,माजी उपसभापती रोशन ढोक,आणि सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य..इतर निष्ठावंत पक्ष कार्यकर्ता वर्ग..

           तद्वतच चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत येत्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला विजयी करण्यासाठी युवा नेते दिवाकर निकुरे हे कामाला लागले असून त्यांनी पक्ष संघटन शक्ती वाढविण्यावर भर दिला आहे.ते आपल्या परीने आवश्यक व उत्तम कार्य करीत असून जनहितार्थ कर्तव्य पार पाडीत आहेत.

         लोक हितार्थ कार्य करणारा कुणी तरी दमदार कार्यकर्ता चिमूर विधानसभातंर्गत काॅंग्रेस पक्षाला हवा होता.जो मतदारांच्या व नागरिकांच्या हृदयात आपल्या कार्यातून स्थान निर्माण करेल.

        काॅंग्रेसचे युवा नेते दिवाकर निकुरे यांनी वरील पध्दतीचे कार्य करणे सुरू केले आहे व ते प्रत्येक गावात जाऊन जुन्यानव्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत व घेणार आहेत.

             एकंदरीत असे की,चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत उमेदवारी कुणालाही मिळो,परंतू पक्ष कार्यकर्त्यांत व पक्ष पदाधिकाऱ्यांत युवा नेते दिवाकर निकुरे यांनी सकारात्मक भावनान्वये,”उमेदवार विजयाची निर्माण केलेली उमेद बोलकी असून,पक्ष कार्यकर्त्यांना उर्जा देणारी ठरणार आहे हेही तितकेच खरे आहे.

       पक्ष कार्यकर्त्यांच्या मनातून मरगड विचार काढून टाकणे आणि आजच्या स्थितीतील विचारसरणीला अनुसरून पक्ष कार्यकर्त्यांना पक्ष मजबूतीचा कानमंत्र देणे अपेक्षित होते. 

      तेच महत्वाचे काम युवा नेते दिवाकर निकुरे करीत आहेत.