मंगेश महाराज कदम यांच्या सहीत पुणे जिल्ह्यातील १३ किर्तनकारांना वारकरी भुषण पुरस्कार जाहीर…

 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : संतभुमी उपासना व पारायण सोहळा मंडळाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत वारकरी परंपरची सेवा करणारे किर्तनकारांस वारकरीभुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहेत, त्यात प्रामुख्याने पुरंदर तालुक्यातील विद्याविभूषित, आंतरराष्ट्रीय किर्तनकार व मृदुंग अलंकार हभप मंगेश महाराज कदम यांना हा वारकरी संप्रदायातील मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे, येत्या गुरुवार दि.१८ रोजी संत निळोबाराया महाराजांचे वंशज हभप गोपाळ काका मकाशीर यांच्या हस्ते आणि हभप ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या अध्यक्षतेखाली वारकरीभुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, पोषाख, तुळशीचा हार, मानाची पगडी, पताका, भक्त विजय ग्रंथ व सतदक्षिणा असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

      मंगेश महाराज कदम हे वारकरी संप्रदायातील विद्याविभूषित किर्तनकार म्हणून ओळखले जाते त्यांनी विविध भाषांमध्ये आपली किर्तनसेवा देश परदेशात सादर केल्या आहेत. कदम महाराज हे आळंदीत श्री हरिहर आध्यात्मिक व शास्त्रीय संगीत शिक्षण गुरुकुलाच्या माध्यमातून आध्यात्मिक व संगीत क्षेत्रासाठी ज्ञानदानाचे पवित्र काम करत आहेत. मंगेश महाराज कदम यांना वारकरी संप्रदायातील मानाचा वारकरीभुषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.