नालवाडा येथिल मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाची चौकशी करण्यात यावी…

युवराज डोंगरे

    उपसंपादक

खल्लार :- नजिकच्या नालवाडा येथिल मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी डॉ. प्रकाश चिंचोळकर यांनी केली आहे.

         नालवाडा येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन रस्ता सुधारण्याचे काम चालू आहे.८०% काम पूर्ण झाल्यावर कामाच्या स्वरूपाबद्दल बोर्ड लावण्यात आले असून यात गावातील एका नालीचे काम दाखविले आहे. मात्र हे काम झालेच नाही.

         ज्या नालीचे काम पूर्ण दाखविले आहे ती नाली गावात जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध असून दबलेली होती ती नाली पूर्णपणे खोदून व त्यातील माती कचरा काढून काम करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता दबलेल्या नालीवरच रस्त्याचे काम केले. त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया

गावातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील टप्पा क्र २ चे काम व्यवस्थित झाले नाही याबाबत संबंधित अभियंता भोरे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे बऱ्याच वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तरच दिले नाही कामाबाबतची लेखी तक्रार संबंधित कार्यालयाकडे करण्यात आली असुन या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

डॉ.प्रकाश चिंचोळकर, तक्रारकर्ते