Home देशविदेश सत्कार आणि सन्मान कुणाचा केला पाहिजे? — विषमतेविरुध्द लढण्याचा दम असायला...

सत्कार आणि सन्मान कुणाचा केला पाहिजे? — विषमतेविरुध्द लढण्याचा दम असायला हवा…

      जे विषमता परिवर्तनाचे आणि विषमता व्यवस्थेच्या परिवर्तनाचे कार्य करतात,अशाच कार्यकर्त्यांचा आणि कार्याचा गौरव केला पाहिजे.

       परंतु असे होताना दिसत नाही,उलट असलेली व्यवस्था टिकविण्याचा किंवा तिची डागडुजी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचाच सत्कार सन्मान केल्या जातो.

         सेवाकार्य किंवा दयापोटी केलेले कार्य परिवर्तन करू शकत नाही.उलट असलेली विषमता टिकविण्याचे कार्य करते.याचा अर्थ असे कार्य म्हणजे विषमतेला मदत करणे होय.तेही समतेच्या विरोधी…

       आपली सेवा,आपला त्याग,आपले ज्ञान हे व्यवस्था परिवर्तनकारी असावे,अशाच कार्यकर्त्यांना पुरस्कार द्यायला पाहिजे.

            बाबा आमटे,अण्णा हजारे,मयंक गांधी,सुंदरलाल बहुगुणा,दर्शन शंकर,यांचे सोबत मी कार्य केले,माझा निष्कर्ष असा की,त्यांचे हे कार्य पथदर्शी आहे,पण परिवर्तनकारी नाही.

         असे काही प्रयोग या विषमतावादी व्यवस्थेत मार्गदर्शक म्हणून साबित होत नाहीत.म्हणून अशा कार्याचे अनुकरण करूनही यशस्वी होत नाही.ते त्यांचे पुरतेच मर्यादित राहते.सर्व देशभर पसरत नाही.अशा कार्यास मर्यादा असतात.सारेच जण हे करू शकत नाही.अनुकरण करता येत नाही.

          अशा तुटक फुटक कार्याने ज्यांच्यासाठी ते कार्य असते,त्या सर्वांचा तरी प्रश्न सुटतो का?तर नाही.म्हणून असे कार्य शेवटी समस्याचे उत्तर होत नाही,उलट हे परिवर्तनाला आडकटी ठरते.

            कारण परिवर्तनवादी,क्रांतिकारी विचारांच्या कार्यकर्त्यांची दिशाभूल करणारे ठरते.

            म्हणून विषमता नष्ट करण्याचे प्रयोग,प्रकल्प,कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या चा सत्कार,सन्मान,,पुरस्कार ,देऊन त्यांनाच उत्साह द्विगुणित केला पाहिजे.

        जी इमारत जीर्ण झाली,ती पडते आहे,अनेकांचा जीव घेते आहे,अशा इमारतीला डागडुजी करण्या पेक्षा तिला पाडून नवी इमारत बांधणे हा विचार,आणि तसे कार्य योग्य होय.समस्याचे उत्तर होय.

           म्हणून आपण गाडगेबाबा जयंतीला अशाच कार्यकर्त्यांना ट्रॉफी द्याव्यात की,जे असलेली व्यवस्था टिकविण्याचे कार्य न करता या प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध विद्रोहाचे कार्य करीत आहेत.

            दत्ता तुमवाड

       सत्यशोधक समाज नांदेड

                  ९४२०९१२२०९