ब्रेकिंग न्यूज…वैधमापण शास्त्र विभागाकडून भद्रावती आठवडी बाजारात ११ दुकानदारावर कारवाई… — अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावतीच्या पत्राची घेतली दखल…

     उमेश कांबळे

तालुका प्रतीनिधी भद्रावती

         दि. १५ : शहरातील अनेक ठोक व चिल्लर दुकानदार, भाजी विक्रेते, मिठाई फरसाण विक्रेते यांच्या कडे असलेला वजन काटा हा बहुतांश प्रमाणित केलेला नसतो. वजनकाटा पडताडणीचे पत्र नेहमी दुकानाच्या दर्शनी भागावर असने अनिवार्य आहे. परंतु अनेक दुकानदार, भाजी विक्रेते वजन काटा पडताळणी न करताच सऱ्हास वापर करतात.

          अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे भद्रावती, चंदनखेडा, घोडपेठ, माजरी, सुमठाणा येथुन दुरध्वनीव्दारे अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. याची दखल घेत ग्राहक पंचायत भद्रावती ने वैध मापण शास्त्र विभाग, वरोरा यांच्याकडे तक्रार दाखल केली. यावर वैध मापण शास्त्र विभाग, वरोरा चे निरीक्षक वाडे यांनी दि.१४ फेब्रुवारी ला बुधवारी आठवडी बाजारात वजन काट्याची तपासणी केली. यात भाजीपाला विक्रेते व इतर दुकानदारांनी वजन काटा पडताळणी न केल्याचे दिसले. तसेच वजनाऐवजी गोट्याचा वापर आणि तराजू ऐवजी पायलीचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. अशा एकुण ११ दुकानदारावर वैध मापण शास्त्र विभागाकडून कारवाई करण्यात आली. शिवाय सुमठाणा, माजरी, घोडपेठ, चंदनखेडा याठिकाणी सुद्धा तपासणी करून खटले नोंदविण्यात आले.

    चौकट 

कोणतीही वस्तू विकत घेत असतांना नागरिकांनी जागृक राहुण खरेदी करावी. वजनकाटा योग्य आहे की नाही याची खात्री करावी. काही संशय असल्यास ग्राहक पंचायत कडे किंवा वैधमापण शास्त्र विभागाकडे तक्रार करावी.

वामण नामपल्लीवार

अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती