पत्रकार म्हणून तुमच्या लेखणीला खूप महत्त्व आहे असेच महत्त्व सगळ्यांना देत जावे पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे उद्गार… — विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व गुरुवर्य बापूसाहेब देहुकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार सन्मान सोहळा संपन्न झाला.

  बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

      पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पत्रकार सन्मान सोहळ्याचे मुख्य आयोजक पुणे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार बाळासाहेब सुतार यांनी केले होते. 

          प्रमुख पाहुणे मान्यवर व पत्रकार बांधव आणि पिंपरी बुद्रुक व पंचक्रोशी येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

           सोलापूर जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे व जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज गुरुवर्य बापूसाहेब देहूकर महाराज यांच्या हस्ते पत्रकार दिना निमित्त पत्रकारांना सन्मान चिन्ह व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

          या प्रसंगी सुतार परिवाराच्या वतीने विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व गुरुवर्य बापूसाहेब देहुकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

             पत्रकार सन्मान सोहळ्या प्रसंगी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे बोलत आसताना म्हणाले की पत्रकार म्हणून तुमच्या लेखणीला खूप महत्त्व आहे आसेच महत्त्व सगळ्यांना देत जावे ही माणस तुमच्या जवळची आहेत. त्यांना तुम्ही विसरत जाऊ नका. कार्यक्रमासाठी जमलेली जिवा भावाची सर्वच माणस प्रेमाची आहेत. मी तुमचाच जिवा भावाचा आसून मला पत्रकार बांधवांनी आशीर्वाद दिला पाहिजे.

        पत्रकार सन्मान सोहळ्या प्रसंगी माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांचे उद्गार.

            तसेच कार्यक्रमासाठी गुरुवर्य बापूसाहेब देहुकर उपस्थिती प्रसंगी पत्रकारांना आशीर्वाद देत म्हणाले की पत्रकार बंधू हे आपल्या लेखणीतून चांगलेच विचार जनतेपर्यंत मांडुन स्पष्टीकरण देत आहेत. अन्याया विरुद्ध लढा देऊन न्याय मिळवून देण्याची चांगलीच कामगिरी नेहमी करीत आसतात.

             पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सुतार व त्यांचे सर्व पत्रकार टीम वर्ग यांना पुढील वाटचालीस आमच्या देहुकर फडाच्या वतीने आशीर्वाद व शुभेच्छा गुरुवर्य बापूसाहेब देहुकर महाराज पत्रकार सन्मान सोहळ्या प्रसंगी बोलत होते.

           पत्रकार सन्माना निमित्त दैंनिक सकाळचे पत्रकार शौंकत तांबोळी, दैनिक लोकमतचे पत्रकार बाळासाहेब सुतार, फुले प्रहारचे संपादक सुधाकर बोराटे, इलेक्ट्रीक मीडियाचे पत्रकार बापू आरडे, इलेक्ट्रिक मीडियाचे पत्रकार दत्ता भाऊ जगताप ,,प्रिंट मीडियाचे पत्रकार सतीश जगताप, इलेक्ट्रिक मीडियाचे पत्रकार आतुल कांबळे, सौरभ सुतार ,संदीप क्षीरसागर ,पांडुरंग भोसले, प्रिंट मीडियाचे पत्रकार धनाजी शेंडगे, वैभव माने, पत्रकार विशाल भोंग, प्रिंट मीडियाचे पत्रकार सतीश पांढरे, प्रिंट मीडियाचे पत्रकार उमाकांत तोरणे या सर्व पत्रकार बांधवांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

          वेळे अभावी उशिरा आलेले 35 पत्रकार बांधवांना देखील, मान सन्मान व पुरस्कार देण्यात आला.

           या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, गुरुवर्य बापूसाहेब देहुकर, सहकार महर्षीचे संचालक श्रीकांत बोडके, माजी चेअरमन बबनदादा बोडके, माजी चेअरमन सुनिल बोडके,सरपंच भाग्यश्री बोडके, सरपंच सुदर्शन बोडके, शरद पवार गटाचे जिल्हाअध्यक्ष सागरबाबा मिसाळ, तरुणांचा कार्यकर्ता छगन (नाना) गायकवाड, दादाभाई शेख, शिवाजी बोडके,हनुमंत पडळकर, कल्याण भंडलकर, युवराज गायकवाड, पप्पू पडळकर, खुदाभाई शेख, प्रवीण बोडके, भाऊ रनदिवे, आरुण बोडके, बाळू पडळकर, शंकर रणदिवे, नागनाथ गायकवाड, आनिल पाटील, तेजस बोडके,आणील गायकवाड ,गोपाळ नरूटे, अरविंद डिसले ,आजिनाथ बोडके, चक्रधर सूर्यवंशी, आण्णासो पाटील,तसेच इतर परिसरातून आलेले आजी – माजी, सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              कार्यक्रमाचे मुख्य आयोजक जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सुतार, ऊप सरपंच संतोष सुतार, भाजप कार्यकर्ता हानुमंत सुतार, तेजेस सुतार, राजेंद्र सुतार ,आक्षय सुतार , किशोर सुतार,सानंद सुतार , सौरभ पांडुरंग सुतार, मयुर सुतार,सह सर्व सुतार परीवार व ग्रामस्थ यांनी केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोआहार घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.