कामगारांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून मन भरून आलं :- हर्षवर्धन पाटील… — वालचंदनगर इंडस्ट्रीज मधील कामगारांच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार संपन्न…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

    नुकताच वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांच्या प्रश्नांबाबत कामगार मंत्र्यांसमवेतच्या बैठकीत मध्यस्थी करून त्यांचा प्रश्न मार्गी लावला. जेव्हा या कामगारांचे आंदोलन सुरू होते, तेव्हाच त्यांना शब्द दिलेला की आता प्रश्न मार्गी लावूनच तुमच्याकडे येणार. यामुळे हा शब्द खरा ठरवल्याचा आणि कामगारांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून मन भरून आलं, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी आज कामगारांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी केले.

      वालचंदनगर इंडस्ट्रीज मधील संपामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी मध्यस्थी करून राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या समवेत बैठक लावून कामगारांचे प्रश्न मिटवला. त्याबद्दल कामगारांच्या वतीने आज हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी उपस्थित राहत हर्षवर्धनभाऊ पाटील यांनी सत्काराचा स्वीकार केला व कामगार बंधू यांच्या समवेत संवाद साधला.

     जे कामगार आपल्या वालचंदनगरचे नाव सातासमुद्रापार घेऊन जात आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावू नये, हीच खूणगाठ मनाशी बांधली होती. त्यांचा प्रश्न मार्गी लागतोय याचं मोठं समाधान आहे. येणाऱ्या काळात त्यांना कसलाच संघर्ष करावा लागणार नाही. यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहणार आहेत. या कामगारांच्या चेहेऱ्यांना आज जो आनंद आणि समाधान दिसलं, ते शब्दात सांगणे कठीण आहे. त्यांचा लढा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. आता त्यांचा संघर्ष थांबला असून आता देशाच्या अनेक मोहिमांमध्ये आपल्या कंपनीचे नाव पुन्हा एकदा यशस्वी करून दाखवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत, असेही हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.