श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षेत श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घव-घवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात अजून एक तूरा लावण्याचे कार्य केले. सन २०२२ – २३ मध्ये झालेल्या उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षेत इयत्ता ५ वी चे एकूण २० विद्यार्थी बसले होते, त्यामध्ये २० ही विद्यार्थी पात्र झाले असून नक्ष किसन टोणपे, विश्वजीत इश्वरचंद्र साहू व राजवर्धन चेतन पाटील हे ३ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादी झळकून स्कॉलरशिप साठी पात्र ठरले. तर इयत्ता आठवीच्या एकूण ३३ विद्यार्थ्यांपैकी एकूण १८ विद्यार्थी पात्र झाले असून सायली अमोल पराये, भक्ती रविकांत राऊत, वैष्णव विलास बागल, प्रणव निळोबाराय शिंदे, सुजित विठ्ठल जोरी व गौरव सुरेश गीते हे ६ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकून स्कॉलरशिप साठी पात्र ठरले.

        या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या गुणवत्ता वाढ व विकास समितीचे प्रमुख नारायण पिंगळे, इयत्ता 5 वीचे समन्वयक श्रीकांत घुंडरे व मार्गदर्शक शिक्षक पोर्णिमा मोरे, छाया कुऱ्हाडे व अतुल भांडवलकर तसेच इयत्ता 8 वीचे समन्वयक अमीर शेख, प्रशांत सोनवणे, हेमांगी कारंजकर, प्रमोद कुलकर्णी, अनुराधा खेसे, इम्रान शेख व शंकर जाधव यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, अनिता गावडे, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.