Home Social वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या अंतिम संस्कारासाठी वनविभागाकडून ५० हजार रुपयांचे आर्थिक...

वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या अंतिम संस्कारासाठी वनविभागाकडून ५० हजार रुपयांचे आर्थिक सहकार्य. — करबडा येथील घटना…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

   आज दिनांक 14/05/2025 रोज बुधवारला सकाळी 8.45 वाजताच्या दरम्यान सौ.कचराबाई अरुण भरडे रा.करबडा वय 52 वर्ष यांना कक्ष क्र.862 मध्ये तेंदुपाने तोडताना वाघाने हल्ला करून ठार मारले.

      त्या बाबत पळसगाव वनपरिक्षेत्राधिकारी यांना माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनकर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पाहणी केली.

      चिमूर पोलिस आणि पळसगाव वनविभाग यांनी पंचनामा करून शवविच्छंदनाकरिता करिता उपजिल्हा रुग्णालयात चिमूर येथे मृतक कचराबाईचे शव दाखल केले. 

       मृत्य महिलाचे पती श्री. अरुण धर्माजी भरडे यांना कचराबाईच्या अंतिम संस्कारासाठी पन्नास हजार रुपयाची (50000 ) आर्थिक मदत वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता मडावी यांनी तात्काळ दिली.