Home शैक्षणिक नवजीवन (सीबीएसई) चा दहावीमध्ये उत्कृष्ट निकाल…

नवजीवन (सीबीएसई) चा दहावीमध्ये उत्कृष्ट निकाल…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल, (सीबीएसई) जमनापूर/साकोली यांचा दहावीचा निकाल दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सर्वोत्कृष्ट लागला आहे. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम घेऊन सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उच्च गुणांनी शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.

        या यशामध्ये आदित्य चौधरी ९५% गुणांसह शाळेत प्रथम, पार्थ कापगते ९४.६०% गुणांसह द्वितीय, भावार्थी नवखरे व रिद्धेश हटवार दोघेही ९१.२०% गुणांसह तृतीय,

        सायना बारसगडे ९०.८०% गुणांसह चतुर्थ, कौस्तुभ भेंडारकर ९०.६०% गुणांसह पाचवे स्थान तर लावण्या घरडे हिने ९०% गुण घेऊन सहाव्या स्थान प्राप्त केले आहे. शाळेतील २८ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तसेच २९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आलेत.

       सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक डॉ.ब्रम्हानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, संस्था सचिव वृंदाताई करंजेकर यांनी अभिनंदन करुन कौतुक केले असून, भविष्यातही असेच यश मिळविण्याची आशा व्यक्त केली आहे.

         शाळेच्या प्राचार्या भारती व्यास, शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे, पर्यवेक्षिका वंदन घोडीचोर यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या मेहनतीने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले. हे आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे.”