इम्तियाज जलील यांच्या सारख्या लोकप्रतिनिधीमुळेच देशाचे सार्वमत्व टिकून : डॉ. कुमार सप्तर्षी… — राज्य सरकार व केंद्र सरकार हे औरंगाबादच्या दंगलीपासून पळ काढत आहे : खासदार इम्तियाज जलील…. — खा.इम्तियाज जलील यांचा पुण्यात विशेष सन्मान सोहळा…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

पुणे : औरंगाबाद येथे रामनवमीच्या दिवशी होऊ घातलेली दंगल रोखण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता ती दंगल यशस्वीपणे रोखण्याचे काम करून खरा लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण इम्तियाज जलील यांनी दाखवुन दिले आहे. इम्तियाज जलील यांच्यासारखे लोकप्रतिनिधी असल्यामुळेच भारताचे सार्वभौमत्व अद्याप पर्यंत टिकून आहे. असे प्रतिपादन युवक क्रांती दलाचे संस्थापक तसेच ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.

          रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार तसेच एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा विशेष सन्मानाचा कार्यक्रम कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते आज पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन युवा मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष राहुल डंबाळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय दलित कोब्रा संघटनेचे संस्थापक ॲड. भाई विवेक चव्हाण , अनिल हातागळे , लुकस केदारी , खिसाल जाफरी , जुबेर मेमन आदी मान्यवर उपस्थित होते.

         सत्काराला उत्तर देताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले की “ यावेळी जात धर्म भाषा प्रांत या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचे देशाचे सार्वमत्व असून हा देश सर्व नागरिकांनी निर्माण केला असून त्याच्या संरक्षणाची जबाबदारी देखील सर्व नागरिकांची आहे. याची जाणीव कायम असल्याने जेथे कोठे कायद्याच्या विरुद्ध विशेषता देशाच्या सार्वभौमत्वविरुद्ध काम करताना कोणी आढळत असेल त्या ठिकाणी आपण समक्ष जाऊन विरोध करायला हवा याची जाणीव ठेवूनच औरंगाबाद मधील दंगल झोपण्यासाठी प्रयत्न करत असताना जीवाची पर्वा करण्याची गरज वाटली नाही.

       औरंगाबाद येथील दंगल ही सरकार पुरस्कृत दंगल होती का ? अशी शक्यता निर्माण करणारे पुरावे उपलब्ध झाले असून या संदर्भामध्ये मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे या संपूर्ण दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. आता या मागणीला एक महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटलेला असताना सुद्धा अद्याप पर्यंत चौकशी समिती नेमण्यात आलेली नाही , त्यामुळे राज्य सरकार व केंद्र सरकार हे औरंगाबादच्या दंगलीपासून पळ काढत आहे हेच यातून स्पष्ट होत आहे. असे असले तरी खासदार या नात्याने मी माझ्या शहराचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध लढाई लढत राहणार व जोपर्यंत औरंगाबाद दंगली मधील सहभागींवर कठोर कारवाई होत नाही किंवा त्याची न्यायालयीन चौकशी होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन देखील खासदार इम्तियाज झालेली यांनी यावेळी केले.

        दरम्यान आपण सारे भारतीय आहोत आणि या देशातील नागरिक हीच या देशाची संपत्ती आहे.आणि त्यांच्या संरक्षणासाठी व विकासासाठी आपण राजकारण करत आहोत हे देशातील बहुतांश लोकप्रतिनिधी विसरून गेलेले आहेत. सत्तेसाठी व पदासाठी धार्मिक ध्रुवीकरण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न अनेक सत्ताधारी पक्षाचे खासदार करत असताना कायम टीकेचे धनी असलेले एम आय एम पक्षाचे नेते व औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र आपण दंगल मिटवणारे खासदार आहोत हे दाखवुन दिले. त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींचा गौरव करणे ही आपली सर्वांचीच नैतिक जबाबदारी असल्यामुळे रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांचा मानपत्र स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मान करीत आहोत. तसेच अशा प्रकारचे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सोबत पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा देखील आम्ही निर्णय या ठिकाणी घेता. अशी भूमिका कार्यक्रमाचे अध्यक्ष व आयोजक राहुल डंबाळे यांनी केली.