ब्रेकिंग न्युज… लेखा येथील व्यक्ती ने घेतली गळफास. — दुःखद् घटना..

 

धानोरा /भाविक करमनकर 

     धानोरा तालुक्या पासुन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या लेखा या गावातील नरेश तोफा वय अंदाजे 52 वर्ष याने आज सकाळी 10 च्या सुमारास गावाजवळील तलावा जवळच्या एका झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची दुःखद् घटना घडली.

       ही घटना दिनांक 14 मे सकाळी अंदाजे 10 च्या सुमारास घडली असून,जंगलातून येणाऱ्या लोकांना झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

      याची माहिती घरच्यांना देण्यात अली.मृत देह झाडावरून उतरून ट्रॅक्टरवर टाकून घरी आणला आहे.घटनेची माहिती फोन वरून पोलीस स्टेशनंला दिली आहे.

      वृत्त लिहिपर्यंत मृतदेह गावातच होता.त्यांना चार मुल,एक मुलगी असा बराच मोठा परिवार आहे.अचानक फाशी घेतल्याने गावात हळहळ व्यक्त करत आहे.