विज्ञाननिष्ठ धम्म रुजवण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत २४ प्रकारचे शिबिर राबवण्याची काळाची गरज- प्रा. डॉ. मुकेश सरदार.

 

रत्नदिप तंतरपाळे/

चांदूरबाजार तालुका प्रतिनिधी

            दिनांक ५ मे रोजी , बुद्ध जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सात गावांचा दहा दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिरांचा सार्वत्रिक समारोपीय समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न.

             भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा चांदूर बाजार अंतर्गत वणी, बेलखेडा, सुरळी, अलीपुर, चिंचोली, सोनोरी, ब्राह्मणवाडा पाठक या गावांमध्ये २६ एप्रिल २०२३ ते ५ मे २०२३ या कालावधीमध्ये दहा दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बुद्ध जयंतीच्या औचित्य साधून ब्राह्मणवाडा पाठक या गावात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती स्थापना,धम्म रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वरसागर भीम गीतांचा ( सागर भिसे ) कार्यक्रम व धम्म उपाशिका प्रशिक्षण शिबिरांचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.

         कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून तथागत भगवान गौतम बुद्ध व प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण, त्रिशरण,पंचशील घेऊन

            धम्मगुरू भंते नागसेन यांच्या कडून धम्मदेसणा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रा. डॉ. मुकेश सरदार सर भारतीय बौद्ध महासभा अमरावती (पश्चिम) हे होते, प्रमुख मार्गदर्शक विजयकुमार चौरपगार (राज्य शाखा विभागीय, सचिव), विलासराव मोहाडे जिल्हाध्यक्ष भा. बौ. महा. अम. ( पूर्व),आयु.मा. प्रा. चंद्रशेखरराव पुं. मोहोड ( मूर्तिदान), प्रमुख उपस्थिती आयु. मा. मंगल निताळेसर जिल्हाकोषाध्यक्ष अम.( पश्चिम),

         आयु.मा.पवन मनोहरे ( तालुकाध्यक्ष चां.बा.), रवींद्र गेडाम जिल्हा उपाध्यक्ष पूर्व, बाळासाहेब चौरपगार तालुका अध्यक्ष भातकुली, प्रमोद राऊत संघटक अमरावती महानगर, परमानंद वासनिक संघटक अमरावती महानगर, नरेंद्र जामणीक माजी तालुका सरचिटणीस दर्यापूर, संगीताताई सरदार केंद्रीय शिक्षिका अम.(पश्चिम) श्रीनिवास तायडे पोलीस पाटील ब्रा.पाठक,संदीपभाऊ देशमुख उपसरपंच- ब्राह्मणवाडा पाठक हे उपस्थितीत होते.

           शिबिरांना मार्गदर्शक म्हणून प्रज्ञाताई इंगळे (अकोला), प्रज्ञाताई ढोंडरे (धुळे), संध्याताई कांबळे (मुंबई), लक्ष्मीताई सराटे (अमरावती) संघमित्राताई आठवले( अमरावती), नलिनीताई थोरात (यवतमाळ) सरस्वतीताई साबळे( बुलढाणा). तसेच शैलेश निरगुडे यांनी सर्व केंद्रीय शिक्षकांचे शाल व पुष्प देऊन स्वागत केले.

    मनोगत – कविताताई फुले (वणी), आचलताई नवले ( बेलखेडा), निर्मलाताई वानखडे (चिंचोली), अंतकलाताई वाघमारे (अलिपुर), मनकर्णाबाई निरगुडे (सुरळी) ,छायाताई वाकोडे (सोनोरी), अर्चनाताई भी. शिरसाट ( ब्राह्मणवाडा पाठक ).

       कार्यक्रमाचे – प्रास्ताविक अमरदीप गवई, संचालन- दिपालीताई खंडारे, आभार- योगेश तानोलकर यांनी केले.

          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवन मनोहरे तालुकाध्यक्ष चां.बा., योगेश तानोलकर तालुका सरचिटणीस, अरुणभाऊ तेलमोरे तालुका कोषाध्यक्ष, अमरदीप गवई उपाध्यक्ष समता सैनिक दल विभाग, राजकुमार खंडारे उपाध्यक्ष संस्कार विभाग, बुद्धभूषण तागडे शहराध्यक्ष, स्वप्निल वानखडे तालुका सचिव संस्कार विभाग, श्रीधरजी वानखडे शहर सचिव चां.बा.

           भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा व महिला मंडळ – महाकारुणिक बहुउद्देशीय महिला मंडळ- वणी, विशाखा बहुउद्देशीय महिला मंडळ- बेलखेडा, रमाई महिला मंडळ – सुरळी, सावित्रीबाई फुले बहुउद्देशी महिला मंडळ – सोनोरी, समता बौद्ध विहार – चिंचोली प्रबुद्ध बहुउद्देशीय महिला मंडळ – अलिपुर, कार्यक्रमाला तन-मन-धनाने सहकार्य भूमिपुत्र बुद्धविहार तथा रमाबाई बहुउद्देशीय महिला मंडळ- ब्राह्मणवाडा पाठक यांनी केले. सरते शेवटी सरणत्तय घेऊन कार्यक्रमाचा समापन करण्यात आला.