Home Political इंदापूर शहरातील दहा प्रभागांमध्ये माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांची पहिली प्रचार फेरी...

इंदापूर शहरातील दहा प्रभागांमध्ये माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांची पहिली प्रचार फेरी पूर्ण… — पाच वर्षांच्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवला, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

       इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता ताई शहा यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील दहा प्रभागांमध्ये पहिली प्रचार फेरी पूर्ण केली आहे. या प्रचार मोहिम `ची सुरुवात महिलांच्या उपस्थितीत आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या जोरदार सहभागातून झाली. नागरिकांशी थेट संपर्क साधत ताईंनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील विकासकाम ांचा आणि सामाजिक उपक्रमांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला.

         या प्रचार फेरीदरम्यान अंकिता ताई शहा यांनी शहरातील प्रत्येक गल्ली बोळ, प्रत्येक वस्तीला भेट देत नागरिकांचे प्रश्न ऐकले. त्यांनी नागरिकांना सांगितले की, आपल्या विश्वासामुळेच मला नगराध्यक्षा म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. त्या काळात मी शहराच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आणि अनेक महत्वाची कामे पूर्ण केली. त्यांनी नागरिकांना पुन्हा एकदा मतदानाचा हक्क बजावत शहराच्या प्रगतीसाठी योग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले.

        शहरातील सर्व दहा प्रभागांमध्ये नागरिकांचा प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद दिसून आला. अनेक ठिकाणी महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी ताईंना ओवाळून स्वागत केले. काही ठिकाणी तर महिलांनी ताईंना फुलांचा वर्षाव करून ताई, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा आत्मीयतेचा संदेश दिला.

अंकिता शहा यांच्या प्रचार फेरीत महिलांचा सहभाग लक्षणीय राहिला.प्रत्येक प्रभागात स्थानिक महिला कार्यकर्त्या, स्वयंसेवी संस्था आणि युवक मंडळांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्याम ळे त्यांच्या प्रचाराला विशेष सामाजिक रंग लाभला आहे. ताईंनी प्रत्येक घराघरात भेट देऊन नागरिकांना त्यांच्या मतांचे महत्त्व पटवून दिले आणि आपल्या मताने विकासाची दिशा ठरते असे सांगितले. या प्रचारादरम्यान त्यांनी नागरिकांना विचारले की, मी केलेल्या कामांबद्दल तुम्ही सम ाधानी आहात का? या प्रश्नावर अनेकांनी उत्साहाने हो, नक्कीच ! असे उत्तर देत त्यांना पाठिंबा दिला.

      काही नागरिकांनी त्यांच्या कार्यकाळातील पिण्याच्या पाण्याच्या योजना, स्वच्छता मोहिमा, रस्ते दुरुस्ती आणि महिलांसाठी चालविलेल्या उपक्रमांची विशेष दखल घेतली. शहरात सुरू असलेल्या या प्रचार फेरीमुळे इंदापूरच्या राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, अंकिता शहा या प्रचार फेरी सुरु करणाऱ्या पहिल्या प्रमुख महिला नेत नेत्या ठरल्या आहेत.

          त्यांच्या प्रचाराच्या नियोजनातून आणि कार्यपद्धतीतून एक संघटित आणि ठाम दृष्टिकोन दिसून येत आहे. नागरिकांचा प्रतिसाद आणि विश्वास पाहता, आगामी निवडणुकीत अंकिता शहा यांना व्यापक पाठिंबा मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. त्यांच्या प्रचार फेरीने इंदापूरमध्ये महिला नेतृत्वाला नवी दिशा आणि बळ दिले आहे.

          एकूणच, अंकिता ताई शहा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या पहिल्या प्रचार फेरीने इंदापूरच्या राजकारणात उर्जा, आत्म विश्वास आणि जनसंपर्काचा नवा अध्याय लिहिला आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता, या प्रचाराचे पुढील टप्पे अधिक जोशात आणि योजनाबद्ध पद्धतीने पार पडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.