आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा… — गरोदर माता व चिमुकल्यांना होतो त्रास….

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

साकोली : येथील शिवाजी वार्ड येथे असलेल्या अंगणवाडीत आरोग्य विभागाचे शिबिराचे आयोजन दर शूक्रवाराला करण्यात येते. यामध्ये तपासणी साठी गरोदर माता व पाच वर्षापर्यंत असलेले चिमुकल्यांना लस देण्यात येते परंतु उन्हाचा कडाका असल्याने येथे येणाऱ्या लाभार्थ्यांना बसण्याची व्यवस्था व पंख्याची सोय नसल्यामुळे ग्रामस्थ आपला संताप व्यक्त करीत आहेत साकोलीतील समाजसेवक महेश पोगडे व गजेंद्र लाडे यांनी शिबिराला भेट दिली असता त्यांना विचारणा केली परंतु त्यांना निराशा जनक उत्तर मिळाले.

       या शिबिरामध्ये प्रसूती झालेल्या माता व नवजात शिशु येत असतात किमान यांना तरी बसण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांनी व समाजसेवकांनी केली आहे.