स्थागुअशा पथक नागपुर ग्रा. ची गहुहिवरा रोड वरील कोळसा टालवर धाड…  — १४ चक्का ट्रक, ४० टन कोळश्यासह २२ लाख रू.चा माल जप्त, एक आरोपी अटक, एक फरार…  

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत गहुहिवरा रोड वरील एस एस इंटरप्राईजेस कोळसा टालवर अवैध रित्या १४ चक्का ट्रक मध्ये विना परवाना चोरीचा कोळसा विकण्याचे तयारीत असताना स्थागुअशा नागपुर ग्रामिण पथकाने धाड मारून ४० टन कोळसा सह एक ट्रक असा एकुण २२ लाख रूपयाचा मुद्देमा ल जप्त दोन आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करून कन्हान पोस्टे च्या स्वाधिन केल्याने पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.

गुरूवार (दि.१२) ऑक्टोंबर २०२३ ला पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत गहुहिवरा रोडवर नीलेश श्रीवास्तव नावाचा ईसम वेकोली खदान येथुन कोळ सा चोरी करून अवैधरीत्या त्याने एसएस इंटरप्राईजेस असे बोर्ड लावलेले टालवर अवैधरित्या कोळसा साठवुन ठेवला आहे. अशा खबरेवरून स्थागुअशा नागपुर ग्रामिण पथकाने पंचासह धाड मारली असता तिथे एक १४ चक्का ट्रक हा कोळस्याने भरलेला टालवर अवैधरित्या विना परवाना चोरीचा कोळसा विकण्याचे तयारीत असताना मिळुन आल्या ने कार्यवाही करित आरोपी १) सलाहुद्दीन सैजाद हुसेन नागोरी वय २६ वर्ष रा. खोरीया सुमरा उज्जैन (उत्तर प्रदेश) यास पकडुन फरार आरोपी नीलेश श्रीवास्तव रा. कोळसा खदान यांचे ताब्यातील ट्रक क्र. एमपी २८ एच १४७२ किमत २० लाख रुपये व त्याती ल कोळसा अंदाजे ४० टन किमत २ लाख रुपये असा एकुण २२ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपींची वैद्यकिय तपासणी करून जप्त मुद्देमाला सह पो स्टे कन्हान यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्यांचे विरूद्ध ३७९,३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवि ण्यात आला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन कन्हान थानेदार वरिष्ट पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते करित आहे.

सदर कारवाई मा.पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से), अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानि क गुन्हे शाखा ना. ग्रा. पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोउप निरिक्षक बट्टूलाल पांडे, एएसआय नाना राऊत, हेकॉ विनोद काळे, गजु चौधरी, ईकबाल शेख, अरविंद भगत, प्रमोद भोयर, संजय बरोदीया, नापोशि विरु नरड, राकेश तालेवार, चालक मोनु शुक्ला आदीनी शिताफितीने करून पार पाडली.