आयुष्यमान भारत योजनेसाठी सर्व नागरीकांनी आयुष्यमान कार्ड काढुन घ्यावे…

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली, दि. १३ : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हि महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्वकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. सन 2020 पासुन देशात यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. त्याच प्रमाणे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना विमा योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अतंर्गत प्रति कुंटुबास 5 लाखा पर्यंत लाभ देण्यात येतो.

        आयुष्यमान भारत योजनेतर्गत मोफत वैद्यकीय उपचाराची सोय केली जाते. मात्र यासाठी कार्ड काढणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्हयात लाभार्थी असुन आतापर्यंत 1,68,016 लाभार्थीनी गोल्डन कार्ड काढलेले आहे.

       महत्वकांक्षी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आल्याने आरोग्य होणा-या वैद्यकीय खर्चाची चिंता मिटली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणी केन्द्र सरकारची पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेचे एकत्री करुन आरोग्य संरक्षण दिड लाखावरुन पाच लाखापर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरीकांना पाच लाख रुपयाचे आरोग्य कवच मिळाले आहे. यासाठी गोल्डन कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड काढुन घ्यावे. गडचिरोली जिल्हयात संपुर्ण आरोग्य संस्थेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये आयुष्यमान कार्ड काढल्या जात आहे. याचा संपुर्ण जनतेनी लाभ घेण्यात यावा. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. दावल साळवे यांनी असे आवाहन केलेले आहे.

आयुष्यमान भारत कार्ड कसे काढावे

       आयुष्यमान भारत योजने अतंर्गत सहभाग नोदंवुन गोल्डन कार्ड काढण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील सरकारी दवाखाना, ग्राममपंचायत, आपले सरकार सेवा केन्द्र, सी.एस.सी. या ठिकाणी सपंर्क करु शकता. या ठिकाणी गोल्डन कार्ड मोफत काढुन मिळेल. या शिवाय जवळील उपकेन्द्र या ठिकाणी गोल्डन कार्ड काढता येवु शकते. कार्ड साठी लागणारे कागदपत्रे लाभार्थी आधार कार्ड, गोल्डन कार्डचे मुख्य फायदे 5 लाखापर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार, विविध दवाखान्याचा समावेश 2 ) कुटुंबातील सर्व व्यक्तीसाठी ही योजना लागु राहील. 3) या योजनेअतंर्गत गडचिरोली जिल्हयाचा रहिवासी असला तरी त्याला जिल्हाबाहेर राज्यात कोठेही आणि राज्याबाहेर देशात कोठेहि योजनेशी अंगीकृत असलेल्या कोणत्याही रुग्णालयात या कार्डचा लाभ घेता येईल. गडचिरोली जिल्हयातील 10 खाजगी व शासकीय रुग्णालय या योजनेसाठी अंगीकृत करण्यात आलेली आहे.

         1) जिल्हा सामान्य रुग्ण्यालय, गडचिरोली 2) जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली 3) उपजिल्हा रुग्णालय, अहेरी 4) उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी 5) उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा 6 ) ग्रामिण रुग्णालय, चामोर्शी 7) सिंधु आर्थोपेडीक हॉस्पीटल, गडचिरोली 8) धन्वंतरी हॉस्पीटल, गडचिरोली 9) लोक बिरदारी प्रकल्प, हेमलकसा 10) सिटी हॉस्पीटल, गडचिरोली यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, डॉ. दावल साळवे यांनी दिली.