आपले सेवा सहकार केंद्र चे सुभारंभ…

 

  सुधाकर दुधे

तालुका प्रतिनिधी सावली

         सावली तालुक्यातील अग्रगण्य असलेली सहकारी संस्था म्हणजे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व्याहाड खुर्द येथे आज CSC आपले सहकार केंद्र चे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष दिपक जवादे यांचे हस्ते करण्यात आले.

         तालुक्यातील अग्रगण्य असलेली सहकारी संस्था म्हणजे व्याहाड खुर्द विविध कार्यकारी सहकारी संस्था होय, सदर संस्था कडे रासायनिक खते, भारत गॅस सेंटर, सहकारी स्वस्त धान्य दुकान, आधारभूत धान खरेदी केंद्र असून संस्था दारवर्षीच नफयात असते.

             संस्थेतील जे सभासद आहेत त्यांची मुलांची शैक्षणिक दाखले, उत्पन्न दाखले, रेशन कार्ड नूतनिकारण करणे, जातींचे दाखले काढणे इत्यादी अडचण लक्ष्यात घेता नवीन व्यवसाय CSC सेंटर (आपले सेवा सहकार केंद्र) चे सुभारंभ करण्यात आले त्यावेळी संस्था अध्यक्ष दिपक जवादे, उपाध्यक्ष हरिजी ठाकरे, व्यवस्थापक विनोद चल्लावार संस्थेचे संचालक केशव भरडकार, निखिल सुरमवार, मारोती बाबनवाडे, देवेद्र टोंगे, लिंगू शेंडे, ओमप्रकाश ढोलणे, रामचंद्र ठाकूर, उमाकांत सहारे, श्रीमती लताबाई रामटेके हे उपस्थित होते.