शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर :- काल गुरुवार 12 जूनला दुपारी दुपारी अडीच वाजता शंकरपूर परिसरात विजांच्या कडकडासह वादळी पाऊस झाल्याने चिमूर तालुक्यातील आंबोली येथील युवकाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला.त्याच्या या आकस्मिक मृत्यूने आंबोली गावात हळहळ व्यक्त होत आहे.
आंबोली येथील इसमाचे नाव श्री.निलेश सुधाकर जंगम वय 46 वर्ष असून हा युवक वादळाने उडालेले टिनाचे शेड उचलण्यासाठी अंगणात गेला असताना शेड उचलताना त्याला विजेचा धक्का लागला. त्यामुळे तो बेशुद्ध होऊन पडला. लगेच त्याला प्राथमिक स्वास्थ्य केंद्र शंकरपूर येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्रेत सवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात चिमूर येथे नेण्यात आले.अंत्य संस्कार आंबोली येथील स्मशानभूमी मध्ये दिनांक 13 जून रोजी करण्यात आले.अधिक तपास शंकरपूर पोलीस चौकीचे पोलीस करीत आहेत.



