Home Maharashtra कोटगाव ग्रामपंचायत… — माझा गाव आणि उत्तम शासन…

कोटगाव ग्रामपंचायत… — माझा गाव आणि उत्तम शासन…

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

       गाव म्हटले की समज,नासमज असलेल्या विविध विचारांचे आणि कृतींचे व्यक्तीमत्वातंर्गत लोक…

      याच व्यक्तीमत्वात गावाचे उत्तम सौंदर्य,सौदार्य व गावाचा संपन्न विकास दडलेला असतोय हे सुद्धा प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे.

         एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वेळ न गमावणारी मानसे गावात क्वचित असतात…

          कुरघोडीच्या विचारात गाव विकास आणि गाव विकासाची कामे दुर्लक्षीत होतात हे तितकेच खरे असले तरी परिपक्व विचारांचे स्थानिक लोकप्रतिनिधी सगळ्यांना सांभाळून घेतात हेही चित्र माझ्या गावात व गटग्रामपंचायत अंतर्गत इतर गावात बघायला मिळाले.याचबरोबर गावात वादविवाद नको म्हणून शांत राहणाऱ्या नागरिकांचे बऱ्याचदा दर्शन झाले..

      गावातील नागरिक आणि गावातील ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी एकमेकांना सांभाळून घेतात हे चित्र सर्व गावचे असले तरी मौजा कोटगाव गटग्रामपंचायत अंतर्गत लोकप्रतिनिधी गाव हितांसाठी नागरिकांना आणि नागरिक गाव विकासासाठी लोकप्रतिनिधींना सहज समजून घेतात.असे एकमेकांचे मैत्रीचे नाते अतूट असल्याचे कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत वारंवार पुढे आले आहे.

          तद्वतच ग्रामसेवक आपल्या गावचा घटक आहे आणि तो गाव विकासाचा केंद्रबिंदू आहे हे गावातील नागरिकांना कळले की गावातील नागरिक ग्रामसेवकांसी जुळवून घेतात हा अनुभव सुध्दा,मौजा कोटगाव वाशियांचाच!

          कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत तात्कालीन एका सरपंचाचा कार्यकाळ सोडला तर सर्व सरपंचांनी विरोध न करता गावलोकांची कामे निडरपणे केलेली आहेत…

         कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत कामे करतांना सरपंच,ग्रामसेवक,सदस्य,यांना आजपर्यंत गावकऱ्यांनी उत्तम सहकार्य केले आहे आणि पुढेही करतील असे वाटते आहे.

           कर्तव्यदक्ष ग्रामसेवक कसे असावे हे तात्कालिक ग्रामसेवक डी.पिल्लेवान,ठावरी,भरडे,यांच्यामुळे लक्षात आले.त्यांनी गावातील सर्व नागरिकांसी जुळवून घेतले आणि गावातील नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न देता लोकहितसंबंधाने वेळेत कर्तव्य पार पाडले..

           आता थोडे काही प्रकरण झाले तरी ग्रामसेवकांना निलंबित केले जातय.यामुळे ग्रामसेवक भिती युक्त वातावरणात कर्तव्य पार पाडतात हे वास्तव आहे.

              कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत भ्रष्ट ग्रामसेवक सुध्दा बघायला मिळाले.एका भ्रष्ट ग्रामसेवकांनी तर काम न करता बॅंकेतून वारंवार रुपये काढण्याचा कहरच केला होता.सदर भ्रष्ट ग्रामसेवकाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार अभय दिले आणि योग्य कारवाई पासून दूर ठेवले.अर्थात भ्रष्ट ग्रामसेवकाला वाचविणाऱ्या चौकशी अधिकाऱ्यांचे हात आर्थिक मायातंर्गत खूप खोलात गेलेले होतेच!

         मौजा कोटगाव येथील नागरिक परस्पर भिन्न विचारांचे आणि वेगवेगळ्या कृतीचे असले तर गाव विकासाचे नुकसान होणार नाही याकडे आवर्जून लक्ष ठेवतात..

          याचबरोबर चुटपुट घटना सोडल्या तर कोटगाव ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य आणि ग्रामसेवक हे ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नागरिकांचे नुकसान होणार नाही यासाठी दक्ष असतात..

            कधी कधी शासन धोरणाची,स्वतःच्या पद कर्तव्याची आणि दोषारोपाची योग्य माहिती नसल्याने सरपंच,सदस्य लोकहिताची कामे करताना सुरुवातीला थोडे अडखळतात हे सुद्धा खरे आहे.. 

         परंतु गाव-हितासाठी,गाव-विकासासाठी,उतंम शासन चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत बऱ्याचदा दिसून आले आणि पुढेही दिसून येणार अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही…

       आशावादी व्यक्तीत्व कळतनकळत नवीन समाज घडवत असतो,याला मान्य केले तर कोटगाव ग्रामपंचायत पदाधिकारी सुध्दा याकडे लक्ष देतीलच!

        पण,मौजा कोटगाव येथील बरेच नागरिक प्रेमळ,मैत्रीभावाचे,असल्याने या ग्रामपंचायत अंतर्गत गावातील नागरिकांचे भविष्यात चांगले असेल असे मानायला हरकत नाही..

       तद्वतच आताचे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेवक सुध्दा लोकहिताकडे आणि गाव विकासाकडे लक्ष देतात,हे सुद्धा लक्षवेधक महत्वाचेच!

*****

        (मौजा कोटगाव गटग्रामपंचायत कार्यालय,चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात आहे.त्यांचे राज्य महाराष्ट्र असून देश भारत आहे.)