शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
वैराग्य मुर्ती संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांत,चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा सातारा ग्रामपंचायतने सहभाग घेतला होता.या सहभागाला अनुसरून मौजा सातारा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह गावातील नागरिकांनी नियमानुसार विविध कामे केली व गावातील लोक उन्नतीचे अनेक उपक्रम सुरु केलीत.
सदर गावविकास कामांची व लोकहितार्थ उपक्रमांची विभागीय निरिक्षण चंमू कडून विशेष बाब म्हणून दखल घेण्यात आली.यामुळे नागपूर विभागिय स्तरावर मौजा सातारा ग्रामपंचायतींने दुसरा क्रमांक पटकावलाय..
नागपूर विभागीय स्तरावर दुसरा क्रमांक आल्यामुळे मौजा सातारा येथील नागरिकांनी,सरपंच,ग्रामविकास अधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्यात सातारा गावचा क्रमांक यावा यासाठी नियमात बसणारे आवश्यक कामे परत केली व गावातील नागरिकांना,महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली.
लोकसहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सातारा ग्रामपंचायतची राज्यस्तरीय पुरस्कारकरिता,राज्यस्तरीय चमू द्वारे तपासणी करण्यात आली.या अगोदर झालेल्या तपासणी मध्ये नागपूर विभागामधून या स्पर्धेत दुसरा क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहेच.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय चमूकडून गावातील पायाभूत सुविधाची पाहणी केली.
सार्वजनिक शौचालय,क्रीडागंण,वाचनालय,शाळेची स्वच्छता,नाडेप खत प्रकल्प,घनकचरा विलगीकरण केंद्र,व्यायामशाळा,जल शुद्धीकारण यंत्र,गरम पाण्याचे यंत्र,पाण्याचे स्रोत,गटारे,सार्वजनिक शोषखड्डे,वयक्तिक सौचालय,कुटुंबाला भेट देऊन स्वच्छतेबाबत पाहणी करून संवाद केला.
राज्यस्तरीय चमूकडून निरिक्षण होत असताना मौजा सातारा ग्रामपंचायतींचे सरपंच गजानन गुळधे,चिमूर प.स.चे.गटविकास अधिकारी नितीन फुलझेले,उपसरपंच वर्षा नन्नावरे,ग्राप सदस्य,वामन बावणे,आशिना नन्नावरे,रविंद्र चौधरी,ग्रामसेवक – गुप्ता,विस्तार अधिकारी व पाणी पुरवठा विभाग,रोजगार हमी योजना विभाग,आरोग्य विभाग,शिक्षण विभाग,अंगणवाडी सेविका – पुष्पा माळवे,आशा वर्कर – लता जांभुळे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष – रतिरामजी कोडापे,श्री.गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वाचनालयाचे विद्यार्थी,युवक मंडळ,महिला बचत गट,व ग्रामवाशी महिला-पुरुष उपस्थित होते…








