शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने,शिवसेना नेते तथा सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात,चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनात चिमूर विधानसभा क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे,महाराष्ट्र राज्य युवासेना विस्तारक मनीष जेठानी,भद्रावती तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक नरेंद्र पढाल,वरोरा विधानसभा समन्वक वैभव डहाणे यांच्या प्रमुख उपस्थित आढावा बैठक विश्रामगृह चिमूर येथे घेण्यात आली.
या आढावा बैठकीत ज्येष्ठ शिवसैनिक विधानसभा संघटक भाऊराव ठोंबरे तसेच श्यामसुंदर खांदारे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून चंद्रपूर जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांच्या समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले.त्यांनी शिवसैनिकांना विधानसभेतील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेट देवून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासंबंधाने सूचना केल्यात.
तसेच घर तेथे शिवसैनिक तयार करा व विधानसभा क्षेत्रात कसून कामाला लागा,असा संदेश दिला.यामुळे विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य व उत्साह निर्माण झालेला आहे.
चिमूर विधानसभा आढावा बैठकीला उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोल्हे,विधानसभा संघटक भाऊराव ठोंबरे,युवासेना उपजिल्हा प्रमुख नाझिम शेख,तालुका प्रमुख राजेन्द्र जाधव,माजी तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते,उपतालुका प्रमुख भैय्याजी कारेकार,केवलसिंग जुनी,सुरेश गजबे,किशोर उकुंडे,विभाग प्रमुख समीर बलकी,शहर प्रमुख नितीन लोणारे,उपशहर प्रमुख मनोज तिजारे,प्रसिध्दी प्रमुख सुनील हिंगणकर,किसन कावळे,अंकीत कारेकार,अशांक सालेकर,विक्की तडकाम,तसेच ज्येष्ठ शिवसैनिक श्यामसुंदर खांदारे उपस्थित होते.



