कुराण आणि प्रमाण सांगावे ही देहुकर फडावरची आजही पद्धत चालु आहे… — ह भ प बापूसाहेब महाराज ढगे यांचे किर्तन सेवे रुपी उदगार….

 

निरा नरसिंहपुर दिनांक :13

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार, 

टणु गावचे ग्रामदैवत भारतरी नाथाच्या पावन भूमीमध्ये चालू आसलेला अखंड हरिनाम सप्ताहाची सातव्या दिवसाची कीर्तन सेवा ह भ प बापूसाहेब महाराज ढगे (सुरवड )यांची झाली. किर्तन सेवे प्रसंगी बोलत आसताना बापूसाहेब ढगे महाराज म्हणाले की ,,कीर्तनामध्ये समाजाला पेललं असं सांगून द्यावे.चांगले विचार सांप्रदायापुढे मांडावे . कुराण आणि प्रमाण सांगावे ही देहू फडवरची पद्धत आजही आहे . याला कितीही किंमत आहे.मन बुद्धी आणि चित्त यांची सांगड घालून परमार्थाची आवड करावी.

ह भ प बापूसाहेब महाराज ढगे यांचे किर्तन सेवे प्रसंगी उद्गार.

 श्री तुकोबाराय गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात चालु आसुन 

 टणु गावचे ग्रामदैवत भरतरी नाथाच्या पावन भूमीमध्ये टणु गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने हा सोहळा सालाबाद प्रमाणे चालु आसून. 24 व्या वर्षाला प्रारंभ झाल्याने

दररोज सर्वच भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितत राहतात. हरिनाम सप्ताहासाठी आलेल्या सर्व भाविक भक्त व ग्रामस्थांसाठी संपूर्ण आन्नदान,व महाप्रसादाची सेवा ही टणु ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे .

  ग्राम पंचायत टणु विद्यमान सरपंच, उपसरपंच, व आजी, माजी, सरपंच,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हायच चेअरमन व सर्व सदस्य, समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळ टणु यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा करण्यात येत आसतो. असंख्य भाविक भक्त या सप्ताहाच्या सोहळ्यामध्ये सामील होत आहेत . 

सर्व ग्रामस्थ, भाविक भक्त, तसेच विणेकरी, टाळकरी, मृदंग वादक, व भाविक हरिनाम सप्ताहासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.शेवटी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार.