राष्ट्रीय महामार्गातंर्गत झनकारगोंदी फाट्यावर 10 तास सर्वपक्षीय बेमुदत चक्काजाम आंदोलन.. — विद्युत समस्यांचे निराकरण होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे भुमिकेवर होते ठाम.. – कुरखेडा – कोरची राष्ट्रीय महामार्गावर होती‌ १० तास‌ वाहतुक ठप्प.. — तहसीलदार सोमनाथ‌ माळी व पोलीसांनी आंदोलन मागे घेण्याची केली विनती‌‌.. — लेखी‌ स्वरूपात हमी मिळत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेनार नाही असी होती आंदोलन कर्त्यांची भुमिका.. — अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसानी ठेवला होता चोख बंदोबस्त‌.. — विघुत वितरण कंपनींच्या लोकांनीं दिले गोदिया‌ जिल्हातंर्गत देवरी वरून फिटर सुरू करण्याचे आश्वासन.. — यानंतर आंदोलन घेण्यात आले मागे..

ऋषी सहारे

संपादक

कोरची 

       गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तसेच महाराष्ट्राच्या सुद्धा शेवटच्या टोकावर छत्तीसगड सीमेलगत असलेला आदिवासीबहुल नक्षलग्रस्त तालुका म्हणजे येथील. मागील तीन वर्षापासून कोरची तालुक्यात विजेची समस्या तालुक्यातील जनतेसाठी डोकेदुखी ठरत असल्यामुळे या समस्येच्या निराकरणासाठी तालुक्यातील सर्व पक्ष हे एकजुटीने झंकारगोंदी फाट्यावर 12 एप्रिल पासून बेमुदत चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे निवेदन आज तहसीलदार यांना देण्यात आले.

                  कोरची तालुका हा डोंगराळ भागात वसलेला असून या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथून आणि गोंदिया जिल्ह्यातील चिचगड येथून विद्युत पुरवठा केला जातो. कोरची ते कुरखेडा दरम्यान 20 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल आहे. त्याचप्रमाणे कोरची ते चिचगड दरम्यान 22 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल आहे. त्यामुळे कोरचीला कुरखेडा आणि चिचगड वरून येणारा विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत असतो म्हणून दोन्ही बाजूने येणारी वीज जोडणी ‘एरियल बंच केबल’ द्वारे करण्यात कारण व तोपर्यंत कोरचीला 33 केवी वीज पुरवठा चिचगड वरून नियमित सुरू ठेवण्यात यावा.

                कोरची तालुक्यातील एकूण गावांची संख्या 133 असून कोरची येथे फक्त 33 केव्ही चे सबस्टेशन आहे. सध्या कुरखेडा वरून कोरची साठी फक्त 24 केव्ही विद्युत पुरवठा केला जातो त्यामुळे कमी दाब होत असल्याने कोणतेही जड उपकरणे चालत नाही व ते निकामी होत असल्याचे दिसून येत आहे. म्हणून कुरखेडा येथे 132 केव्ही च्या मुख्य स्टेशनची निर्मिती करून कोरची ला 66 केव्ही च्या सबस्टेशनची निर्मिती करण्यात यावी कारण कोरची वरूनच नवनिर्मित ढोलडोंगरी सब स्टेशनला 33 केवी वीज पुरवठा होणार आहे.

                   कोरची येथील सब स्टेशन मध्ये 30 वर्षापेक्षा जास्त कालावधीची जुनी उपकरणे असल्यामुळे त्यामुळे सुद्धा विद्युत पुरवठा करण्यास अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे नवीन उपकरणे लावून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच कोरची हे तालुक्याचे ठिकाण असून सर्व शासकीय कार्यालय व ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे कोरची फिडर हा वेगळा करण्यात यावा. मागील चार-पाच वर्षापासून कोरची तालुक्यात कृषी पंपाची संख्या वाढत असून कृषी पंपांना पाहिजे त्या दाबाचा विद्युत पुरवठा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कृषी पंप चालवणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे कृषी पंपाचे फिडर सुद्धा वेगळे करण्यात यावे. अशा विविध मागणीसह तहसीलदार सोमनाथ माळी यांना निवेदन देण्यात आले यावेळी सर्वपक्षीय आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रतापसिंह गजभिये, सचिव नंदकिशोर वैरागडे,भाजपा तालुका अध्यक्ष नसरुद्दीन भामानी, काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सियाराम हलामी, शिवसेना तालुका अध्यक्ष डॉ. नरेश देशमुख हकीमुद्दीन शेख, सदरुद्दिन भामानी, आनंद चौबे , डॉ. शैलेंद्र बिसेन सौ. हर्षलता भैसारे, , सौ. कुमारीताई जमकातन, दुर्गा मडावी, प्रमिताई काटेंगे,. देवराव गजभिये, रामसुराम काटेंगे, सुरज हेमके, धनीराम हीडामी, झाडूराम सलामे, राजेश नैताम, अशोक गावतुरे, नितीन रहेजा, चेतन कराडे, घनश्याम अग्रवाल, आशिष अग्रवाल, वसीम शेख, , सदाराम नुरुटी, ,अनिल केरामी, धनिराम हिडामी,गंगासाय मडावी, कृष्णाजी कावळे,शंकर शाहु ,डी.पी.केरामी सरपंच विलास होळी,चेतन किसान सरपंच,सौ.सुनिता मडावी सरपंच रुपराम देवांगन,कु.मंजुषा कुमरे सरपं,अनिल जनबंधु उपसरपंच, राहुल मलगाम सरपंच,किशोर नरोटे सरपंच,सावजी बोगा सरपंच,मदन कोल्हे सरपंच,रविता हलामी सरपंच,विजय हिडामी सरपंच, छत्रपत्ती बांगरे,नाशिक नागमोती,यंशवत वाळदे मेघश्याम जमकातन,गोविंद दरवडे,हिराभाऊ राऊत,शामकुमार यादव,महिला‌ पुरुष‌‌ बहुसंख्यत उपस्थित होते.

          विद्युत वितरण कंपनीच्या लोकांनीं गोंदिया जिल्ह्यातुनदेवरी वरन एक फिटर सुरू करण्याचें लेखी दिले अश्वासन 

 ‌‌ ‌बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आले पोलीसांचा चोक बंदोबस्तात ठेवण्यात आला होता. कोणतीच अनुचित प्रकार् घडल नाही.

लिखित स्वरूपात घेऊनच आंदोलन मागे घेण्यात आले.