Home क्रीडा विद्यापीठ स्तरीय अंतर महाविद्यालयीन रस्साखेच स्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात उत्साहात संपन्न…

विद्यापीठ स्तरीय अंतर महाविद्यालयीन रस्साखेच स्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात उत्साहात संपन्न…

      रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

चिमूर/- स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर व गोंडवाना विद्यापीठ, शगडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय अंतर महाविद्यालयीन रस्साखेच स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

       या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून गांधी सेवा शिक्षण समितीचे कोषाध्यक्ष प्रा.महादेवरावजी पिसे उपस्थित होते. 

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य डॉ.पितांबर पिसे होते.कार्यक्रमाला प्रा.डॉ. कार्तिक पाटील,डॉ.हरेश गजभिये,डॉ.नितिन कत्रोजवार तसेच विविध महाविद्यालयांतून आलेले क्रीडा संचालक डॉ.राजू चावके,डॉ.शैलेंद्र गिरीपुंजे,डॉ. कुलदीप गोंड,प्रा.विकी पेटकर,डॉ.संगपाल नारनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

         स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या वरिष्ठ तसेच कनिष्ठ प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.तसेच विविध महाविद्यालयांतून सहभागी झालेले रस्साखेच स्पर्धेतील मुले व मुली खेळाडू मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

        कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. उदय मेंडूलकर,संचालक,शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांनी केले,आभार प्रदर्शन प्रा.दुर्योधन रोकडे यांनी केले.

         या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती,संघभावना,शिस्त व आरोग्यविषयक जाणीव निर्माण होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक समितीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.