शेतकरी,शेतमजूर,कामगार कष्टकरी मी सेवक जनतेचा,भारतमातेचा,या देशाचा तरी गुलाम मी,जे माझे कष्ट विकत घेतात त्यांचा!…
— 2
कर्मचारी,अधिकारी मी प्रशासकीय सेवेतला नोकर,मी सत्ताधाऱ्यांचा अखेर गुलामच!…..
— 3
राष्ट्रपती राज्यपाल,प्रधानमंत्री मुख्यमंत्री,सभापती सभागृहाचा मंत्री मी सत्तेतला,तरी गुलामच मी,जमीनदार-भांडवलदार- कारखानदारांचा!…
जमीनदार,कारखानदार,भांडवलदार,कंपनीवाले हेच मालक या देशाचे,देशातील सारी संपती आणि देशातील सऱ्या जनतेची बुद्धी आणि श्रम यावर मालकी त्यांचीच!…
म्हणून विकत घेणारे ते मालक आणि विकतात ते गुलाम!,खरेदी विक्रीचा हा बाजार असलेली व्यवस्था म्हणजेच शोषण व्यवस्था!,म्हणजेच विषमतेची व्यवस्था,विषमतावादी व्यवस्था!….
या व्यवस्थेचे शोषक,सेवक,नोकर बळी,आम्ही पिढ्यान् पिढ्यांचे.किती किती आणि किती काळ हे सहन करायचे,बस झाले आता सहनशीलतेची मर्यादा संपली..


