Home Political महानगरपालिका निवडणुक म्हणजे नागरिकांची सनद,मतदारांनी विचारपूर्वक मताधिकाराचा हक्क बजावला पाहिजे… —...

महानगरपालिका निवडणुक म्हणजे नागरिकांची सनद,मतदारांनी विचारपूर्वक मताधिकाराचा हक्क बजावला पाहिजे… — नगरसेवक कसा असावा याचा आढावा वृत्त विश्लेषणात…

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

       नागरिकांची सनद म्हणजे शासनाच्या किंवा सरकारी संस्थेच्या नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा,त्यांचे standards (मानके),वेळ मर्यादा,आणि तक्रार निवारण प्रक्रिया स्पष्ट करणारा एक वचनबद्ध दस्तऐवज आहे.

         ज्यामुळे प्रशासनात पारदर्शकता (transparency), जबाबदारी (accountability) आणि नागरिकाभिमुखता (citizen-centricity) वाढते. यात सेवांचा दर्जा,माहितीचा अधिकार,निवड,गैर-भेदभाव,आणि तक्रार निवारण यांसारख्या बाबींचा समावेश असतो.ज्यामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संबंध सुधारतात. 

मुख्य उद्दिष्ट्ये…

१) सार्वजनिक सेवांचा दर्जा उंचावणे.

२) पारदर्शकता म्हणजे नियम,प्रक्रिया आणि मानके स्पष्ट करणे.

३) जबाबदारी म्हणजे अधिकारी आणि संस्थांना जबाबदार धरणे.

४) सक्षमीकरण म्हणजे नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करून त्यांना सक्षम करणे. 

सनदेतील प्रमुख घटक….

१) सेवांचे वर्णन:- कोणती सेवा दिली जाईल.

२) मानके (Standards): सेवेचा अपेक्षित दर्जा आणि वेळ मर्यादा.

३) माहिती आणि निवड म्हणजे नागरिकांना उपलब्ध पर्याय आणि माहिती.

४) तक्रार निवारण म्हणजे तक्रार दाखल करण्याची आणि निवारण मिळवण्याची प्रक्रिया.

५) नागरिकांकडून अपेक्षा म्हणजे सेवांचा योग्य वापर आणि सहकार्य.

         भारतात अंमलबजावणीसाठी १९९७ मध्ये मुख्यमंत्री परिषदेत ‘नागरिकांची सनद’ स्वीकारण्यात आली.केंद्र आणि राज्य सरकारांनी विविध विभागांसाठी सनदा तयार केल्या आहेत.

         महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (DGIPR) आणि इतर विभागांनी सनदा प्रसिद्ध केल्या आहेत. 

महत्त्व….

       नागरिकांची सनद हे एक महत्त्वाचे साधन आहे जे प्रशासनाला अधिक प्रतिसाद देणारे आणि लोकाभिमुख बनवते,तसेच नागरिकांना त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यास मदत करते.

          नागरिकांची सनद हा सरकारी संस्थेने नागरिकांना/ग्राहक गटांना पुरविल्या जाणाऱ्या किंवा त्यांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा/योजनांच्या संदर्भात केलेल्या वचनबद्धतेचा दस्तऐवज आहे. 

          नागरिक आणि प्रशासन यांच्यात पूल बांधणे आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन प्रशासन सुव्यवस्थित करणे हा चार्टर व्यायामाचा उद्देश आहे.

          नागरिकांची सनद ही संकल्पना सुशासन (Good Governance), पारदर्शकता (Transparency), आणि जबाबदारी (Accountability) यांचा भाग आहे,ज्याचा उद्देश सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा करणे आणि नागरिक-केंद्रित प्रशासन प्रस्थापित करणे हा आहे.

      यात सेवांची गुणवत्ता, कालावधी आणि तक्रार निवारण यांसारख्या बाबींचा समावेश असतो. 

मुख्य मुद्दे….

       सुशासनाचे साधन ही संकल्पना प्रशासनात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांना माहिती देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी वापरली जाते.

      वचनबद्धतेचा दस्तऐवज,शासकीय कार्यालयांनी नागरिकांना पुरवायच्या सेवांबद्दल दिलेले हे एक वचनपत्र आहे,ज्यात सेवांची माहिती,गुणवत्ता आणि वेळेची मर्यादा स्पष्ट केलेली असते.

         नागरिकांचे हक्क,या सनदेमुळे नागरिकांना त्यांचे हक्क आणि कर्तव्ये समजतात आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवता येते.

          पारदर्शकता आणि जबाबदारी,सेवा पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करते आणि सेवांमध्ये सुधारणा घडवून आणते.

नगरसेवक असा असावा….

                म्हणूनच जबाबदार,कर्तव्यदक्ष,कर्तव्यक्षम, लोकांसी सुसंवाद साधणाऱ्या,आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांची कामे/समस्या निकाली काढून देणारा,नागरिकांचा आदर करणारा,वार्डातील समस्यांना समजून घेत त्यानुसार कामे करणारा नगरसेवक हवा आहे.

         जात,धर्म,पंथानुसार द्वेष व भेदभाव न करणारा नगरसेवक हा विशेषतः न्याय पुर्वक भुमीका घेणारा असतो हे लक्षात घेऊन मतदारांनी नगरसेविका व नगरसेवकांची मताधिकाराच्या माध्यमातून निवड केली पाहिजे.

              केवळ विकास कामे करतो यावर भर देणारे उमेदवार असतील तर वार्डातील नागरिकांच्या वैयक्तिक पातळीवरील महत्वपूर्ण समस्या सोडविण्यासाठी ते पुढे येणारे नाहित हे मतदारांनी लक्षात घेतले पाहिजे.

            पक्षाचे उमेदवार किंवा अपक्ष उमेदवार यांना आपण ५ वर्षासाठी महानगरपालिकेचे म्हणजे त्या महानगराचे नेतृत्व करण्यासाठी पाठवतो आहे.परंतु तो नगरसेवक पक्षाच्या भूमिकेसह मतदारांचे संरक्षण करणारा असावा,नागरिकांचे हक्क पायदळी तुडविणारा नसावा,महानगरपालिका अंतर्गत येत असलेले आरोग्य केंद्रे,(दवाखाने),शाळा,पाणि पुरवठा व स्वच्छता विभाग,सामाजिक विभाग,हे महानगरातंर्गत येत असलेल्या जमीनीसह भांडवलदारांच्या घशात घालण्याच्या भुमिकेचा नसावा,याची जाणीव ठेवून नगरसेवक निवडीला मतदारांनी महत्व व प्राधान्य दिले पाहिजे..

             तद्वतच निवडून देत असलेल्या नगरसेवकाला शासन व प्रशासनाची जाणिव असावी,तो नगरसेवक दडपणाखाली न येता सभागृहात व महानगरपालिका अंतर्गत येत असलेल्या संबंधित सर्व कार्यालयात लोकांच्या कामासाठी सातत्याने धडपडणारा असावा हे मतदारांनी लक्षात घेतले पाहिजे.

            नागरिकांच्या सर्व प्रकारच्या अधिकारांना व समस्यांना गिळंकृत करणारा नगरसेवक नसावा,यासाठी योग्य नगरसेवक निवडून द्यायचा असतो.

मताचा अधिकार….

            योग्य लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी भारत देशातील सर्व नागरिकांना मताचा अधिकार भारत निर्माता,घटनाकार तथा जगमान्य थोर समाजसुधारक तथा महाविद्वान,डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे….

            याचबरोबर स्वतःचे सर्वोतोपरी संरक्षण करण्यासाठी,स्वतःचा,देशाचा विकास करण्यासाठी व स्वतःच्या अधिकारांना वाचविण्यासाठी मताचा अधिकार सर्व प्रोढ महिला-पुरुषांना,डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे हे मतदारांनी सखोलपणे समजून घ्यावे…

           या मताधिकारात देशासह,राज्याचे,महानगराचे,नगराचे, ग्रामीण भागातील सर्व खेड्यांचे,स्वतःचे प्रेम दडलेले आहे.