Home कृषी हरभरा शेतीशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… — मौजा सरडपार परिसरातील शेतात पार...

हरभरा शेतीशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… — मौजा सरडपार परिसरातील शेतात पार पडली शेती शाळा…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

      चिमूर तालुक्यातील सरडपार येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हरभरा पिकावरील महिला शेतीशाळा उत्साहात पार पडली.ही शेतीशाळा होस्ट फार्मर केशव सहारे यांच्या शेतावर आयोजित करण्यात आली होती.

        या शेतीशाळेमध्ये हरभरा पिकावरील विविध किडी व रोगांचे प्रत्यक्ष शेतात निरीक्षण करण्यात आले.यामध्ये महिला शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. 

        किड-रोग ओळख,प्रतिबंधात्मक उपाययोजना याबरोबरच कामगंध सापळे,पक्षी थांबे यांचे महत्त्व व त्याचा उत्पादन वाढीवर होणारा सकारात्मक परिणाम याबाबत सहाय्यक कृषी अधिकारी पी.जी.सदगर यांनी मार्गदर्शन केले.तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

         महाविस्तार एआय अ‍ॅप तसेच एन.डी.के.एस.पी. योजनेंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया याबाबत सहाय्यक कृषी अधिकारी बी.बी.येवले यांनी सविस्तर माहिती दिली.

            ही शेतीशाळा तालुका कृषी अधिकारी एस.पी.पुजारी व मंडळ कृषी अधिकारी आर.बी.सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. 

           कार्यक्रमास समूह सहाय्यक किशोरी लोणबले यांच्यासह गावातील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.