दिपकबाबूच्या लढ्याने पोलिस पाटलांचा वाढणार आत्मसन्मान.. — त्यांचे सामाजिक,शैक्षणिक,राजकीय कार्य आधार देणारे.. — “वाढदिवसानिमित्त,…

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

         पारशिवनी येथील सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव व पोलिस पाटील संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष दिपकबाबू पालीवाल यांचा १३ डिसेंबर बुधवारला वाढदिवस आहे…

       सर्वोदय शिक्षण मंडळा तर्फे केसरीमल पालीवाल विघालय व कला वाणिज्य व विज्ञान आणि व्यवसाय महाविद्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीच्या वाटा व भविष्य उज्ज्वल करण्यासाठी दिपकबाबू पालीवाल सदैव तत्पर असतात.

            याचबरोबर दिपकबाबू पालीवाल यांनी आपल्या सामाजिक दायित्वातून राज्यातील पोलिस पाटीलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी शासन स्तरावर आपल्या लढवैय्या शैलीने लढा उभारला व पोलीस पाटील संघटना अध्यक्ष म्हणून भविष्यात पोलिस पाटलांना दिपकबाबूच्या लढ्याने आत्मसन्मान प्राप्त करून देण्यासाठी शासन दरबारी आपण वेळोवेळी पाठपुरावा करून पोलिस पाटलांच्या समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे सांगितले.

              नागपूर हिवाळी अधिवेशनात पोलीस पाटील यांच्या मानधन वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी साखळी उपोषण सुरू केले आहे.

          दिपकबाबूच्या लढ्याने राज्यातील पोलीस पाटीलाना

निश्चितच न्याय हक्क मिळणार आहे.

          दिपकबाबूच्या सामाजिक कार्याने व प्रेरणादायी उपक्रंमाने रामटेक विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण आदिवासी क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.

        शैक्षणिक,सामाजीक व राजकीय क्षेत्रात दिपकबाबूच्या कार्यात बहुमुल्य वाटा आहे.ग्रामीण आदिवासी भागातील गावांमध्ये त्यांच्या उपचारार्थ आरोग्य शिबीरे घेतले,विद्यार्थी विद्यार्थिंनी करीता शैक्षणिक उपक्रम राबविले.

            सामाजिक दायित्व निभावून त्यांनी सामुहिक विवाह आपल्या संस्थेच्या माध्यमातून केले.

         दिपकबाबूच्या सामाजिक,राजकीय,शैक्षणीक कार्यामुळे आणि त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे लाखो लोकांच्या मनात दिपकबाबूने स्थान प्राप्त केले आहे.

          आज पर्यंत पारशिवनी येथील एकाही राजकीय पक्षांनी विधान सभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना दिली नाही.फक्त आपल्या राजकारणासाठी त्यांचा उपयोग करून घेतला.

         पारशिवनी तालुक्याचा व ग्रामीण आदिवासी क्षेत्राचा आजही पाहिजे तसा विकास झाला नाही.

              जो पर्यंत पारशिवनीचा स्थानीक आमदार होणार नाही तो पर्यंत तालुक्यातील समस्या मार्गी लागणार नाही असे स्पष्ट मत बांबूचे आहे.

           दिपकबाबूच्या सामाजिक,शैक्षणीक,राजकिय,कार्याला बळकटी मिळावी हिच सदिच्छा त्यांच्याप्रती रामटेक विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची आहे.

           दिपकबाबूंना वाढदिवसानिमित्त माझ्यासह रामटेक विधानसभा मतदारसंघातील नागरिक मनस्वी हार्दिक शुभेच्छा प्रदान करणार आहेत.

            त्यांना उंदड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.