Home Maharashtra नेरी येथील राघोबा बार व खडसंगी येथील देशी दारुचा परवाना रद्द करण्याची...

नेरी येथील राघोबा बार व खडसंगी येथील देशी दारुचा परवाना रद्द करण्याची केली मागणी… — चिमूर तालुका शिवसेना (उबाठा) संघटक केवलसिंग जुनी यांची चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल….

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

        चिमुर तालुक्यातील मौजा खडसंगी येथील मानकर यांच्या देशी दारू दुकानाची चौकशी करून त्यांच्या देशी दारू दुकानाचा मद्य परवाना रद्द करण्याची मागणी चिमूर तालुका शिवसेना (उबाठा) संघटक केवलसिंग जुनी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

          याचबरोबर नेरी येथील राघोबा बार ची चौकशी करून सदर बारचा मद्य परवांगा रद्द करण्याची मागणी सुध्दा केवलसिंग जुनी यांनी केली आहे.

          निवेदनात म्हटले आहे की चिमूर तालुक्यातील मौजा खडसंगी येथील मानकर यांचे देशी दारू दुकान सकाळी ५:०० वाजता पासून नियमित सुरु होत असते,देशी दारूचे दुकान सकाळी ५ वाजता सुरू ठेवणे म्हणजे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाचे उल्लंघन करणे आहे.

        सदर देशी दारू दुकान परवानाधारक हा एक-दोन व्यक्तीच्या माध्यमातून देशीदारुचे दुकान सकाळी ०५ वाजता खोलून दारू विक्री नियमित करीत असतोय.

           मद्य परवाना अंतर्गत ठरवून दिलेल्या वेळेचे उल्लचन देशी दारू दुकान मालक करीत असुन,सदर घटनाक्रमाची संपूर्ण चौकसी करून दारू दुकानाचा मद्य परवांगा रद्द करण्यात यावा असे मत निवेदनकर्ता यांचे आहे.

        तसेच चिमूर तालुक्यातील मौजा नेरी येथील राघोबा बार सकाळच्या वेळी ७:०० वाजता पासुन नियमित सुरू होत असते.बार मालक हा स्वःता मागच्या दरवाजा उघडून खुलेआम बार चालू करीत असतो.

        मागच्या दारातंर्गत राघोबा बार सकाळी ७ वाजता पासून नियमित चालू राहत असतोय.यामुळे बार मालक बार परवाना नियमाचे नियमित उल्लघन करीत असुन त्यांची संपूर्ण चौकसी करून बार चा परवांगा रद्द करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उबाठा चिमूर तालुका संघटक केवलसिंग जुनी यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

        तसेच शिवसेना (उबाठा) चिमूर तालुका संघटक केवलसिंग जुनी यांच्या मते तालूक्यात खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत.उदा.बिअर शॉप हे बार प्रमाणे चालवीतात,अवैधपणे देशी दारूचा पुरवठा करणे,स‌ट्टा व्यवसाय जोमाने सुरू असणे,सुगंधीत तंबाकू विकणे,गांजा विकणे,पत्ते खेळणे,अवैध रेती व मुरमाचे उत्खनन करणे,अशा प्रकारचे अवैध धंदे चिमूर तालुक्यात सुरू आहेत.

            अवैध धंदे सुरु असण्यामागे चिरीमिरीचे व्यवहार होत असा आरोप त्यांनी निवेदनाद्वारे केला आहे.अधिकारी व कर्मचारी हे आर्थिक व्यवहार करुन अवैध धंदे सुरु ठेवतात अशी चर्चा चिमूर तालुक्यातील नागरिकाद्वारे होल आहे असल्याची माहिती जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिली आहे.

         निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक चंद्रपूर,अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर,उपविभागीय अधिकारी चिमूर,जि.चंद्रपूर,उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर,जि. चंद्रपूर,अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क चिमूर,जि.चंद्रपूर यांना देण्यात आल्या आहेत.